पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझच्या उपाध्यक्ष मरियम नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आता मरियम शरीफ यांनी असं म्हटलं आहे की इम्रान खान हे इतके घाबरले होते की त्यांनी माझ्यावर तुरुंगातही असतानाही नजर ठेवली होती. एवढंच नाही तर बाथरुममध्येही छुपे कॅमेरे बसवले होते. पाकिस्तानचं सरकार हे महिला विरोधी सरकार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. मरियम शरीफ यांना मागील वर्षी चौधरी शुगर मिल केसमध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी तुरुंगात असताना तिथेही नजर ठेवण्यात आली आणि बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावले गेले होते असा आरोप आता मरियम यांनी केला आहे.

जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मरियम शरीफ यांनी हा गंभीर आरोप केला आहे. “मी दोनदा तुरुंगात गेले, या काळात एका महिलेला तुरुंगात मिळालेली वागणूक ही अत्यंत हीन आणि घृणास्पद होती. सरकारला त्यांचे तोंड दाखवण्याचीही लायकी राहिली नाही” असंही त्या म्हणाल्या. “एका पक्षाच्या उपाध्यक्षपदी असलेल्या महिलेला जर घरी येऊन त्यांच्या वडिलांसमोर अटक केली जात असेल तर पाकिस्तानात कोणतीही महिला सुरक्षित नाही. पाकिस्तान असो किंवा जगातला कोणताही देश कुठेही महिला कमकुवत नाहीत हे इम्रान खान सरकारने विसरु नये” असंही मरियम म्हणाल्या.

asaduddin owaisi
VIDEO : “देशात सर्वाधिक कंडोम मुस्लीम लोक वापरतात, तरीही…”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ विधानावर ओवैसींचे उत्तर
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
Sharad Pawar On PM Narendra Modi
शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका; म्हणाले, “रशियाचे पुतिन आणि मोदी…”

मरियम नवाझ यांनी इम्रान सरकारवर गंभीर आरोप केला आहे. जर मरियम नवाझ यांच्या घराचा दरवाजा तोडला जाऊ शकतो.. जर खरं बोलण्यासाठी मरियम नवाझला तिच्या वडिलांसमोर अटक केली जाऊ शकते तर काहीही घडू शकतं. मला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी माझ्या बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावण्यात आले होते. अशा सगळ्या परिस्थितीत पाकिस्तानात महिला सुरक्षित आहेत असं कसं म्हणता येईल? असंही मरियम नवाझ यांनी म्हटलं आहे.