न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर किंवा एनईटी म्हणजे शरीरातील हार्मोन्स तयार करणाऱ्या पेशींमधल्या (न्यूरोएन्डोक्राइन पेशी) टिशूजची अनियंत्रित वाढ. अशा प्रकारचा ट्यूमर आतड्यांमध्ये होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याचप्रमाणे असा ट्यूमर फुप्फुसामध्ये किंवा शरीराच्या कुठल्याही अवयवामध्ये होऊ शकतो.

शरीरामधल्या हार्मोन तयार करणाऱ्या एन्डोक्राइन पेशींमध्ये ट्यूमर झाला तर त्याला एन्डोक्राइन ट्यूमर म्हणतात, आणि मज्जासंस्थेच्या पेशींशी संबंधित हा ट्यूमर असेल तर त्याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर म्हणतात. इरफान खानला झालेला ट्यूमर हा या प्रकारातला आहे. ट्यूमरचं स्वरूप गंभीर आहे की चिंता करण्यासारखं नाही हे ठरतं ट्यूमर सौम्य स्वरुपाचा आहे की त्याची तीव्रता जास्त आहे यावरून. शरीराच्या ज्या भागात प्रादुर्भाव झाला आहे आणि त्याचा प्रसार शरीराच्या अन्य भागात झालाय का, झाला असेल तर किती झालाय यावरही ट्यूमर सौम्य आहे की तीव्रता अवलंबून असते.

Remote Cleaning Tips
Jugaad Video: चपातीचे मळलेले पीठ एकदा AC च्या रिमोटला लावून बघा; काय कमाल झाली एकदा पाहाच!
article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : नागरी सेवा कल चाचणी (CSAT) (भाग २)
self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
Horrific accident to speedy Scorpio 3 dead 5 injured in buldhana
बुलढाणा : भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात, ३ ठार, ५ जखमी

न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरचे प्रकार

एनईटीचे अनेक प्रकार असू शकतात. कुठल्या अवयवाला तो झालाय यावर प्रकार अवलंबून असतो. फेक्रोमोसायटोमा, मर्केल सेल कॅन्सर, न्यूरोएन्डोक्राइन कार्सिनोमा, पॅरागँग्लिओमा असे विविध प्रकार असल्याचे डॉक्टर सांगतात.

क्रोमाफिन पेशी ज्या अड्रेनलाइनची निर्मिती करतात, यांच्याशी संबंधित असेल तर तो फेक्रोमोसायटोमा प्रकारचा ट्यूमर असतो. या ट्यूमरचा संबंध चिंताग्रस्त जीवनशैलीशी असतो.

मर्केल सेल कॅन्सर हा अत्यंत दुर्मिळ परंतु वेगानं शरीराचा ताबा घेणारा प्रकार आहे. त्वचेच्या खाली आणि केसांच्या मूळाशी असलेल्या पेशींमध्ये हा होतो. या स्थितीला त्वचेचा न्यूरोडोक्राइन कार्सिनोवा असंही म्हणतात. साधारणपणे या प्रकारचा त्रास गळा व डोक्याला होतो.

न्यूरोडोक्राइन कार्सिनोवाचा प्रादुर्भाव शरीराच्या अन्य भागातही होऊ शकतो, जसा की आतड्याचा भाग, फुप्फुस व मेंदू.

न्यूरोडोक्राइन ट्यूमरवर रूग्ण मात करण्याची शक्यता किती आहे हे शरीराच्या कुठल्या अवयवाला झालाय, तीव्रता किती आहे का सौम्य आहे अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

हा दुर्मिळ आजार असून जर अत्यंत सौम्य स्वरुपाचा असताना लक्षात आला तर रुग्णाचं नशीब बलवत्तर असं म्हणता येईल. इरफान खानच्या बाबतीत अनेक गोष्टी अद्याप स्पष्ट झालेल्या नसून इतकी आशा मात्र आपण नक्की करू शकतो की त्याला झालेला न्यूरोडोक्राइन ट्यूमर फार तीव्र नसावा आणि उपचारांनी इरफान बरा होऊ शकेल.