Tigress Vs Bear On Camera Fight: अस्वल हा प्राणी सर्वात आळशी प्राणी म्हणून ओळखला जातो. मात्र अस्वलही वाघावर भारी पडू शकतो, असा एक व्हिडोओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंहाच्या किंवा सिहिंणीच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे सिंहाच्या नादाला कुणी लागत नाही. पण अशी हिंमत एका अस्वलानं केलीय. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा सुरु होतो एक भक्ष आणि भक्षक यांच्यातील जीवन-मरणाचा संघर्ष. पण आमनेसामने आलेले दोन्ही प्राणी जर मांसाहारी असतील तर? दोघांमध्ये नेमके कोण जिंकेल? हे तुम्ही या व्हिडीओमध्येच पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं…

अस्वल आणि इतर प्राण्यांच्या फाइटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. पण ताजा व्हिडीओ असा आहे जो बघून लोकांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. यात एक अस्वल आणि सिहींण आमनेसामने येतात. पण आश्चर्याची बाब दोघेही एकमेकांना जराही स्पर्श करत नाहीत. हा व्हिडीओ निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी डॉ. रवी गुप्ता यांनी हा व्हिडिओ एक्स हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक भव्य वाघीण आणि अस्वल आमनेनसामने येते. दोन्ही प्राण्यांमध्ये होणारी चकमक पर्यटक जीपमध्ये दूरुन पाहत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने नेटीझन्सना चांगलेच प्रभावीत केले आहे. पण ही घटना पाहणारे प्रेक्षकही चांगलेच आश्चर्यचकीत झाले आहेत.

Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
Cheetah attack deer viral video
VIDEO: ‘शिकार करो या शिकार बनो’ चित्ता आणि हरणामध्ये झटापट; हरणाच्या ‘त्या’ झेपेची सोशल मीडियावर चर्चा
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Viral Video Girls Fall Down badly on scooty
आधी स्टाईल मारली मग स्कूटीवरुन धपकन पडल्या तरुणी; ‘हा’ VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Passengers Inside Patna To Kanpur Train over seat issues
हद्दच झाली! ट्रेनमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक

पर्यटकांसमोर अचानक घडलेल्या प्रसंगात पाहायला मिळते की, झुडुपातून एक अस्वल बाहेर पडते आणि वाघिणीच्या समोरून रस्ता ओलांडते. अनपेक्षित चकमक होऊनही, वाघीण संयम राखते. अस्वलाच्या हालचालींचे लक्षपूर्वक निरीक्षण करते. अस्वल विरुद्ध बाजूने आपला प्रवास सुरू ठेवत असताना वाघीण पाहत असते. मात्र दोन्ही प्राणी दोन्ही बाजूंनी संयम पाळतात. त्यामुळे याठिकाणी संभाव्य संघर्ष टळतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गुजरातमधील प्राथमिक शाळेच्या निकालात मास्तरांचा प्रताप; विद्यार्थ्याला २०० पैकी २१२ गुण; उत्तरपत्रिका पाहून व्हाल लोटपोट

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने म्हंटलंय की, “अस्वलाच्या जिद्दीला सलाम”, तर दुसरा युजर म्हणतो, “भीतीची भीती कशाला.”