मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींविरोधात पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयात खटला सुरू आहे. मात्र या खटल्याचे काम पाहू नये यासाठी आरोपींना पाठिंबा देणाऱ्या संघटनेकडून साक्षीदारांना आणि सरकारी वकिलांना धमक्या दिल्या जात आहेत. या धमक्यांच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र वकिलांनी दहशतवादविरोधी न्यायालयाला लिहिले आहे.
या खटल्यातील मुख्य वकील चौधरी अझर यांच्यासह इतर वकिलांना रावळपिंडी येथील दहशतवादविरोधी न्यायालयात बुधवारी निवेदन सादर करून जेयूडीच्या सदस्यांकडून धमकावण्यात येत असून आम्हाला तसेच साक्षीदारांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.