उत्तराखंडमधील आपत्ती आणि तेथील मदतकार्य यावरून कोणीही राजकारण करू नये, असा सल्ला कॉंग्रेसच्या सरचिटणीस अंबिका सोनी यांनी बुधवारी दिला. 
उत्तराखंडमधील कॉंग्रेसचे सरकार बरखास्त करण्याची मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सोमवारी केली होती. महापुरानंतर तेथील मदतकार्यामध्ये मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप स्वराज यांनी केला होता. त्याला उत्तर देताना अंबिका सोनी यांनी याविषयावरून राजकारण न करण्याचा सल्ला दिला.
ज्यावेळी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन उत्तराखंडच्या पुनर्वसनात सहभाग घ्यायला हवा, त्यावेळी कोणी अशी टीका करणे दुर्दैवी आहे. या विषयात कोणतेही राजकारण आणू नये, असे अंबिका सोनी म्हणाल्या.