परभणी – आंतरजातीय प्रियकराशी विवाह करणाऱ्या मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना पालम तालुक्यातील नाव्हा येथे २१ ते २२ एप्रिल दरम्यान घडली. तब्बल दहा ते बारा दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मृत मुलीचे वडील बालासाहेब भीमराव बाबर, आई रुखमीनबाई बालासाहेब बाबर, अच्यूत दत्तराव बाबर, राजेभाऊ रखमाजी बाबर, अशोक रूस्तूमराव बाबर, आबासाहेब रूस्तूमराव बाबर, गंगाधर योगाजी बाबर, गोपाळ अशोक बाबर यांच्याविरूद्ध शुक्रवारी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा >>> सोलापुरात कचरा आगारापाठोपाठ स्मार्ट सिटीच्या पाईप साठ्यालाही मोठी आग

walchand college of engineering
वालचंद महाविद्यालय बळकाविण्यासाठी अडवणुकीचे सत्र
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
transfers in states forensic scientific laboratories are frequently deferred
नागपूर : शासकीय सेवांमधील बदल्या रखडल्या; ‘या’ विभागात नियमांची पायमल्ली!
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
Bombay HC
उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा ‘fake news’ fact check rule मोडीत का काढला? त्रयस्थ न्यायाधीशांची गरज का भासली?
Rajasthan bureaucrat dies after botched surgery
राजस्थानच्या सहाय्यक जिल्हाधिकारी चुकीच्या शस्त्रक्रियेचा बळी? कोण होत्या प्रियांका बिश्नोई?
Separate compartment, senior citizens,
दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा, एका मालडब्याचे ज्येष्ठांसाठीच्या डब्यात रूपांतर, रेल्वे प्रशासनाची उच्च न्यायालयाला माहिती
sharad pawar wrote letter to cm eknath shinde
Sharad Pawar : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शरद पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; भेटीची वेळ मागत म्हणाले…

नाव्हा येथील १९ वर्षीय मुलीचे गावातील एका तरुणासोबत प्रेम होते. पण मुलीचा प्रियकर आंतरजातीय असल्याने त्याच्याशी विवाह करू नये असा दबाव टाकत मुलींच्या आई वडिलांनी विरोध केला. तरीही मुलगी प्रियकरासोबत आंतरजातीय विवाह करण्यावर ठाम होती. त्यामुळे घरात झोपलेल्या मुलीची २१ एप्रिल रोजी रात्री गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर कोणालाही थांगपत्ता लागणार नाही, यासाठी रात्री भावकीतील निवडक लोकांच्या उपस्थितीत मृत मुलीचे प्रेत जाळून टाकत पुरावा नष्ट करण्यात आला . या अंत्यविधीला उपस्थित असणाऱ्या लोकांना घटनेची माहिती होती. तरीही पोलिसांना या घटनेची कल्पना देण्याचे जाणीवपूर्वक टाळले आणि अपराधास सहाय्य केल्याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील करीत आहेत. तपासासाठी न्यायवैद्यक शास्त्र विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, पालम पोलिसांचे पथके घटनास्थळी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.