महिलांचा लैंगिक छळ होण्याच्या ५२६ घटना २०१४ या वर्षांत देशभरात घडल्या आहेत. कार्यालयीन ठिकाणी लैंगिक छळाच्या ५७ घटना नोंदवल्या गेल्या आहेत, असे सरकारने आज लोकसभेत सांगितले.
एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१४ मध्ये कार्यालयीन ठिकाणी लैंगिक छळाच्या ५७ घटना घडल्या असून इतर ठिकाणी ४६९ घटना घडल्या आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने दिलेल्या माहितीनुसार कार्यालयीन ठिकाणी विनयभंगाचे (भादंवि ५०९) प्रकार जास्त प्रमाणात झाले आहेत.