आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडिया महत्वपूर्ण भूमिका बजावेल अशी माहितीसमोर येत आहे. लोकसभा निवडणुकांसाठीच्या १६० जागांवर सोशल मीडियाचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयआरपीएस नॉलेज फाऊंडेशन आणि भारतीय इंटरनेट तसेच मोबाईल असोसिएशनने केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, “आगामी लोकसभा निवडणुकांच्या एकूण ५४३ जागांपैकी १६० महत्वपूर्ण मतदार संघात सोशल मीडियाचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे.” तसेच “याचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रामध्ये दिसून येईल” असेही त्यात नमुद करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या २१ आणि गुजरातच्या १७ मतदार संघांचा समावेश या १६० जागांमध्ये करण्यात आला आहे.
ज्या मतदार संघात एकूण मतदारांपैकी दहा टक्के मतदार फेसबुक वापरणारे आहेत अशा जागांचा समावेश सोशल मीडियाचा हाय इन्पॅक्ट असणा-या जागांमध्ये करण्यात आला आहे.