उत्तर प्रदेशमधील कासगंज जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. येथे प्रवाशांना घेऊन जाणारे एक ट्रॅक्टर ट्रॉलीसहित थेट तलावात पडल्यामुळे तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला तसेच लहान मुलांचाही समावेश आहे. रविवारी (२४ फेब्रुवारी) हा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रॅक्टर ट्रॉलीत एकूण ४० जण बसलेले होते. यातील अनेकजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवास गंगेत स्नान करण्यासाठी निघाले होते

पोलिसांनी सांगितल्यानुसार कासगंज जिल्ह्यातील गधाई गावाजवळ रियाजगंज-पटियाली रस्त्यावर हा अपघात घडला. ट्रॅक्टरमधून प्रवास करणारे प्रवासी हे मूळचे एटा जिल्ह्यातील जैथारा गावातील होते. हे प्रवासी गंगेत स्नान करण्यासाठी ते कादरगंजकडे जात होते.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टरचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचा ट्रॅक्टरवरील तोल सुटला. ज्यामुळे अपघात झाला. “तलावात पडलेल्या प्रवाशांना बुलडोझरच्या मदतीने बाहेर काढले जात आहे. तर जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातादरम्यान ट्रॅक्टर अन्य वाहनांवरही आदळले. त्यामुळे इतर वाहनांचाही यावेळी अपघात झाला. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे,” असे किसनगंज पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची आर्थिक मदत

दरम्यान, या घटनेची दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 people dead tractor trolley fell into pond in uttar pradesh kasganj district prd