मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू जुंदाल आणि अन्य काही जणांवर बेकायदशीर शस्त्र कारखाना उभारल्याबाबत विशेष न्यायालयाने शनिवारी आरोप निश्चित केले. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती दया प्रकाश यांनी ‘इन-कॅमेरा’ सुनावणीत जुंदाल आणि अन्य आरोपींवर आरोप निश्चित केले. या खटल्याची सुनावणी ४ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे.