तुर्कीची आर्थिक राजधानी असलेल्या इस्तंबूलमध्ये एका निवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या खालच्या मजल्यावर नाईटक्लब होता. या नाईटक्लबमध्ये आग लागल्याचे प्रथामिक वृत्त आहे. या आगीत तब्बल २९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

आग लागली तेव्हा सुरुवातीला १५ मृत आणि आठ जखमी झाले होते. परंतु, बेसिकतास जिल्ह्यातील गायरेटेपे येथे आगीत प्राण गमावलेल्या लोकांची संख्या २९ झाली आहे”, असे राज्यपाल दावूत गुल यांच्या कर्यालयाने स्पष्ट केलं आहे. “आगीत जखमी झालेल्या एका व्यक्तीवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत”, असेही त्यात म्हटले आहे.कार्यालयाने सांगितले की आग दुपारी १२.४७ मिनिटांनी लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ आग नियंत्रणात आणली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 29 killed after fire breaks out in istanbul nightclub sgk
First published on: 02-04-2024 at 20:41 IST