नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आम आदमी पक्षाने महिला मतदारांना डोळय़ासमोर ठेवून ‘मुख्यमंत्री महिला सन्मान’ या नावाने नवी ‘लाडली बहना’ योजना लागू केली आहे. या योजनेसाठी २ हजार कोटींची अर्थसंकल्पीय तरतूदही केली असून १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिलांना दरमहा १ हजार रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या तत्कालीन शिवराज सिंह सरकारची ‘लाडली बहना’ योजना विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवणारी ठरली होती. त्याचाच कित्ता ‘आप’ने गिरवला आहे.

अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आतिशी यांनी ‘मुख्यमंत्री महिला सन्मान’ योजनेची घोषणा केली. निवृत्ती वेतनाच्या इतर कोणत्याही योजनेची लाभार्थी नसलेली व करदाता नसलेली दिल्लीची १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते. लाभार्थीकडे दिल्लीतील मतदार ओळखपत्र असणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>>‘डीएमके’नं लुटलेले जनतेचे पैसे मी परत करणार; मोदींची तमिळ जनतेला गॅरंटी

‘आप’लाही रामराज्याची आठवण

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर रामराज्य हा राजकीय शब्द बनला असून ‘आप’लाही रामराज्याची आठवण झाली आहे. रामराज्य अवतरण्यासाठी अजून खूप काही करणे बाकी असले तरी त्यादृष्टीने नऊ वर्षांमध्ये आप सरकार बरेच काम केलेले आहे, असे आतिशी अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या.

‘तीन मंत्री तुरुंगात तरीही रामराज्य?’

‘आप’च्या रामराज्याच्या उल्लेखाची भाजपने खिल्ली उडवली आहे. ज्या सरकारमधील तीन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत, त्यांना आता रामराज्याची आठवण होत आहे. ज्यांचे शिक्षणमंत्री दारूमंत्री असतात, तिथे रामराज्य कसे अवतरणार, असा सवाल भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aam aadmi party arvind kejriwal delhi lok sabha elections scheme amy