गतवर्षी प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील शेतकरी मोर्चादरम्यान लाल किल्ल्यावर शीखांचा धार्मिक ध्वज फडकावल्याच्या प्रकरणानंतर चर्चेत आलेला पंजाबी अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता दीप सिद्धू याचा मंगळवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला. कुंडली-मानेसर-पालवाल द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला. त्यात जखमी झालेल्या दीप यास खारखोडा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप सिद्धू चालवित असलेली कार रस्त्यावर उभ्या असलेल्या मालमोटारीला धडकली. यातच त्याचा मृत्यू ओढवला.

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू

 लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात अटक होण्याआधीही दीप सिद्धू यास अन्य दोन प्रकरणांत अटक झाली होती. लाल किल्ला प्रकरणात त्याच्यावर धार्मिक ध्वज फडकावल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्याला पोलिसांनी गतवर्षी फेब्रुवारीत अटक केली होती. त्याच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान करून हिंसाचारास उत्तेजन दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. लाल किल्ला हिंसाचारात तोच मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी दिल्ली न्यायालयात सांगितले होते. मात्र तो प्रसिद्ध व्यक्ती असल्याने पोलीस त्याचे नाव घेत असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. त्याला दीर्घकाळ तुरुंगात ठेवणे म्हणजे जगण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्यापासून वंचित ठेवणे ठरेल, असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. त्यानंतर काही तासांतच दिल्ली पोलिसांनी त्याला पुन्हा संरक्षित स्मारकाची नासधास केल्याप्रकरणी अटक केली. पण हे कायद्याच्या प्रक्रियेचे हनन असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

शेतकरी संघटनांनी आरोप केला होता की, दीप याचे भाजपशी संबंध असून त्यानेच आंदोलकांना लाल किल्ल्याकडे नेण्याचा प्रयत्न केला होता.