उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. तसंच, योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्या प्रत्येक आरोपाला एक एक करून चोख प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री योगी म्हणाले, आम्ही तिथे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता आणि संकल्पापासून ते सिद्धीपर्यंत पोहोचलो. आमचे धोरण, हेतू आणि नियतही स्पष्ट आहे, आम्ही धर्माच्या मार्गावर आलो आहोत आणि त्याचे चांगले परिणामही मिळत आहेत. अखिलेश यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, पांडवांनी दुर्योधनाकडे फक्त पाच गावे मागितली तशी आम्ही तीनच मागितली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगी आदित्यानाथ म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराचा निर्णय न्यायालयाने घेतला असेल, पण अयोध्येवर अन्याय झाला. आमचा अपमान झाला, आम्ही अयोध्या, काशी आणि मथुराची मागणी करत होतो आणि करत आहोत. हे काही सामान्य ठिकाण नाही. ते भगवान श्रीकृष्णाला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न करत होते. नंदीबाबा आता काशीतही प्रकटले आहेत. दुर्योधनाने ज्या प्रकारे पांडवांना पाच गावे देण्याचेही मान्य केले नाही, त्याचीच पुनरावृत्ती झाली. पांडवांवर अन्याय झाला. इथेही तेच घडले. अयोध्येत निर्बंध घातले होते.

हेही वाचा >> व्हॉट्सॲप चॅटमुळे हेमंत सोरेन यांच्या पोलीस कोठडीत वाढ, ईडीला नक्की काय सापडलं?

विधानसभेच्या अधिवेशनातील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, आज लोक मंदिराच्या उभारणीने भारावून गेले आहेत, पण एक वेळ अशी होती की अयोध्येतील विकासकामे ठप्प झाली होती. हा हेतू, धोरणाचा मुद्दा आहे.

राम मंदिराच्या अभिषेकचा उल्लेख करताना ते म्हणाले की, ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हे काम पूर्ण झाले आहे. प्रभू राम यांना त्यांच्या अस्मितेसाठी संघर्ष करावा लागला असे जगातील पहिले उदाहरण होते. आज अयोध्येत जे घडले ते याआधीही घडू शकले असते. विकास यापूर्वीही होऊ शकला असता. रस्ते रुंद होऊ शकले असते. विमानतळ बांधता आले असते. पण मथुरा काशी वृंदावनाचा विकास थांबला.

अखिलेश यादवही बरसले

अखिलेश यादव यांनीही सीएम योगींना सभागृहात घेरले. अखिलेश यादव म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्थेबाबत झिरो टॉलरन्स आहे असे तुम्ही म्हणता, मग महिलांवर सर्वाधिक गुन्हे का होतात? सर्वाधिक घटना त्यांच्याविरुद्धच का घडत आहेत? गुन्हे का?” देशात उत्तर प्रदेश अव्वल?

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After ayodhya now kashi and mathura target yogi adityanath told bjps next plan sgk
Show comments