भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेल्या सिमीच्या (स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) आठ दहशतवाद्यांना मध्यप्रदेश पोलिसांनी अवघ्या काही तासात कंठस्नान घातले. परंतु त्यांच्या या कारवाईवर आता अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पोलिसांच्या कारवाईवर शंका उपस्थित केली आहे. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या भोपाळ मध्यवर्ती तुरूंगातून सिमीचे आठ दहशतवादी पळून जाणे धक्कादायक असून या कैद्यांकडे एवढे चांगले कपडे, हातात घड्याळ, बूट या वस्तू कुठून आल्या असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
भोपाळच्या तुरूंगात अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असते. अशा ठिकाणाहून हे दहशतवादी पळून जातातच कसे, त्यांच्या अंगावर एवढे चांगले कपडे कसे येतात, असा सवाल उपस्थित करत हा संपूर्ण प्रकारच अविश्वसनीय असल्याचे खासदार ओवेसी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले. गृहमंत्रालय आणि पोलिसांच्या वक्तव्यात तफावत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची स्वतंत्र चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनी या वेळी केली.

भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेले आठ दहशतवादी चकमकीत ठार झाले आहेत. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी पोलिसांकडून मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. भोपाळसह दिल्ली शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला होता. शोधमोहीम सुरू असताना भोपाळ शहराच्या बाहेर असलेल्या इंटखेडी भागातील एका घरात हे दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे ठिकाणी भोपाळ मध्यवर्ती कारागृहापासून १० किलोमीटर अंतरावर आहे. यावेळी पोलिसांनी घराला घेराव घालून त्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्यामुळे पोलिसांना नाईलजाने गोळीबार करावा लागला. या गोळीबारात सिमीचे आठही दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांनी रविवारी रात्री कारागृहातील एका सुरक्षारक्षकाची हत्या करून पलायन केले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, पहाटे दोन ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. कारागृहाच्या बी ब्लॉकमध्ये दहशतवाद्यांना ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांनी बराक तोडून मुख्य सुरक्षारक्षक रमाशंकर आणि अन्य एका चाकुने सुरक्षारक्षकावर हल्ला चढवला. यामध्ये रमाशंकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कारागृहाची भिंत ओलांडण्यासाठी दहशतवाद्यांनी चादरीच्या सहाय्याने बनवलेल्या दोराचा वापर केला. या दोराच्या सहाय्याने हे सर्व दहशतवादी भिंतीवर चढले आणि ते पसार झाले. मोहम्मद खालीद, जाकिर हुसैन सादिक, अकील खिलची, मुजीब शेख, माजिद, सलीम, महबूब आणि अमजद अशी पसार दहशतवाद्यांची नावे आहेत. भोपाळ मध्यवर्ती कारागृह हे राज्यातील सर्वात सुरक्षित कारागृह समजले जाते. त्यामुळे या दहशतवाद्यांना याठिकाणी ठेवण्यात आले होते.

Governor, MLA, Court,
उद्या कोणी याचिका करून पद्म पुरस्काराची मागणी करेल, उच्च न्यायालयाचे हस्तक्षेप याचिका करणाऱ्यांना खडेबोल
cleaning dirt by hand, banning laws,
हाताने मैला साफ करण्याची कृप्रथा : बंदी घालणाऱ्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, उच्च न्यायालयाचे आदेश
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना