कन्याकुमारीतून सुरु झालेली ‘भारत जोडो यात्रा’ देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये पोहचली आहे. यात्रा दिल्लीत पोहचल्यानंतर ८ दिवसांची विश्रांती घेण्यात आली होती. मंगळवारपासून ( ३ जानेवारी ) काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात पुन्हा यात्रा सुरु झाली आहे. ‘भारत जोडो यात्रा’ उत्तरप्रदेशमधील गाझियाबादमध्ये पोहचल्यावर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनी तिचं स्वागत केलं. त्यातच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नात्यातील एक प्रेमाचा क्षण समोर आला आहे.

‘भारत जोडो यात्रे’त राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून प्रियंका गांधी चालताना दिसत आहेत. अशात भारतीय युवक काँग्रेसने राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यावर ‘भावा बहिणीचं अतूट प्रेम’ असं कॅप्शन लिहलं आहे. यामध्ये राहुल गांधी प्रेमाने प्रियंका गांधींच्या गालावर किस करताना दिसत आहेत. भावा बहिणींच्या नात्यातील हा प्रेमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

elon musk postpones trip to india
‘टेस्ला’चे मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर; वर्षअखेरीस भेटीचे सुतोवाच
lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Nagpur, Rain, Pm Narendra Modi,
नागपूर : मोदींच्या सभास्थळी पावसाचे पाणी, शिंदेंकडून मध्यरात्री पाहणी
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत

दरम्यान, यावेळी बोलताना प्रियंका गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “राहुल गांधींचा मला गर्व आहे. सरकारने राहुल गांधींची प्रतिमा खराब करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले. विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरीही राहुल गांधी घाबरले नाही,” असं प्रियंका गांधी म्हणाल्या.