पीटीआय, पेशावर : अफगाणिस्तानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात एका कट्टरवादी इस्लामी राजकीय पक्षाच्या सभेत एका आत्मघातकी हल्लेखोराने रविवारी घडवून आणलेल्या शक्तिशाली स्फोटात किमान ४० जण ठार, तर दोनशेहून अधिक लोक जखमी झाले.

 बजाऊर आदिवासी जिल्ह्याची राजधानी असलेल्या खार येथे जमियत उलेमा-इ-इस्लाम-फझल (जेयूआय-एफ) पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संमेलनात दुपारी ४ वाजता हा स्फोट झाला. जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिका येऊन पोहचल्यानंतर, घाबरलेले लोक स्फोटस्थळी गोळा होत असल्याचे दूरचित्रवाहिनीवरील दृश्यांत दिसून आले. स्फोट झाला, त्यावेळी पाचशेहून अधिक लोक संमेलनात सहभागी झाले होते.

Sanjay Raut on Ajit pawar (1)
“मला सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजाने…”, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, “एका गृहिणीला…”
Jail
नुपूर शर्मासह तिघांना धमक्या, सनातन संघटनेच्या अध्यक्षाच्या हत्येचा कट; मुस्लीम धर्मगुरूला सुरतमधून अटक!
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

हा आत्मघातकी स्फोट असल्याचे प्राथमिक तपासात आढळल्याचे मालकंद रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक मेहमूद सत्ती यांनी सांगितले. तथापि, स्फोटाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी पुरावा गोळा करण्यात येत आहे. या संपूर्ण भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे, असे ते म्हणाले. अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या घटनेचा तपास करावा, अशी मागणी जेयूआय-एफ चे प्रमुख फझलुर रहमान यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि प्रांताचे काळजीवाहू मुख्यमंत्री आझम खान यांच्याकडे केली आहे.