ओडिशामध्ये जमावाकडून सीबीआय टीमवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सीबीआयची टीम चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी छापेमारी करण्यासाठी गेली होती. यावेळी संतप्त जमावाने त्यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. अखेर स्थानिक पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांची जमावापासून सुटका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयने मंगळवारी उत्तर प्रदेश, ओडिशासहित १४ राज्यांमधील ७७ ठिकाणांवर छापेमारी केली होती. या छापेमारीत उत्तर प्रदेशमधील छोट्या जिल्ह्यांपासून ते नोएडा, गाजियाबादसारखे मोठे शहर आणि राजस्थानच्या नागौर, जयपूर, अजमेरपासून ते तामिळनाडूमधील कोईम्बतूरसारख्या शहरांचा समावेश आहे.

चौकशीमुळे लोकांचा संताप

सीबीआयच्या टीमने ओडिशामध्ये कारवाई करण्यासाठी पोहोचली होती. सीबीआयने सकाळी सात वाजता ढेंकनल येथील सुरेंद्र नायकच्या घऱावर छापा टाकला. सीबीआय टीम दुपारपर्यंत चौकशी करत होती. यावेळी स्थानिक लोक संतापले आणि त्यांनी सीबीआयच्या पथकावर हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, हातामध्ये काठ्या घेत सीबीआय अधिकाऱ्यांना घेरण्यात आलं आणि नंतर त्यांना मारहाण करण्यात आली. हल्ला करण्यासाआधी लोकांनी सीबीआय अधिकाऱ्यांना सुरेंद्र नायकच्या घरातून खेचत बाहेर आणलं होतं. मारहाण सुरु असताना स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांची सुटका केली.

या ठिकाणांवर छापेमारी

सीबीआयने १४ नोव्हेंबरला चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी ८३ आरोपींविरोधात २३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले. याच प्रकरणी मंगळवारी सीबीआयने १४ राज्यांमधील ७७ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये दिल्लीमधील १९, उत्तर प्रदेशातील ११, आंध्र प्रदेशातील २, गुजरातमधील ३, पंजाबमधील ४, बिहारमधील २, हरियाणामधील ४, ओडिशामधील ३, तामिळनाडूमधील ५, राजस्थानमधील ४, महाराष्ट्रातील ३, छत्तीसगड, मध्ये प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येक एक जागेचा समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi team attacked by locals during raid over online child sexual abuse material in odisha sgy
Show comments