चंदिगढमध्ये भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्या तरुणीला कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना १६ जानेवारी रोजी समोर आली . या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अपघातग्रस्त तरुणीचे नाव तेजस्विता असून सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेसंदर्भात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. मात्र तेजस्विताच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तेजस्विता या तरुणीला कारने धडक दिल्याच्या घटनेनंतर दोन दिवसांनी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. याच कारणामुळे तिच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केला आहे. “आम्ही या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज मिळवले. ते फूटेज आम्ही स्वत: पोलिसांना दिले. त्यानंतरच पोलिसांनी तक्रार दाखल केली,” असे तेजस्विताचे कुटुंबीय म्हणाले आहेत.
घटनेचा व्हिडीओ आला समोर
चंदिगढमधील तरुणीला एका कारने धडक दिल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. याच घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. यामध्ये तरुणी भटक्या कुत्र्यांना खायला देत असल्याचे दिसत आहे. याच वेळी मागून थार गाडीने तिला धडक दिली आहे. या घटनेनंतर तरुणीच्या आजूबाजूचे श्वान पळून गले आहेत. या घटनेमध्ये तेजस्विता गंभीर जखमी झाली आहे.
तेजस्विताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मागील आठवड्यात शनिवारी रात्री घडली होती. तेजस्विता आपली आईसोबत रोज रात्री भटक्या कुत्र्यांना खायला देत असे. नेहमीप्रमाणे शनिवारीदेखील तेजस्विता आपल्या आईसोबत कुत्र्यांना खायला देत होती. मात्र यावेळी मागून भरधाव वेगात एक कार आली. या कारने तेजस्विताला धडक दिली. तसेच अपघातानंतर न थांबता हा कारचालक थेट निघून गेला.
#WATCH | A woman was hit by a speeding car in Chandigarh while she was feeding street dogs.
Police says that FIR is being registered. The incident happened in Sector 53 and the woman is currently undergoing treatment at the hospital (16.01)
अपघाताच्या घटनेनंतर तेजस्विताचा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तेजस्विताच्या आईने तिच्या कुटुंबीयांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर तेजस्विताला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तेजस्वितावर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे म्हटले जात आहे.