वादग्रस्त अध्यादेशावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेली टीका हे नाटक आहे. त्यामुळे आता काँग्रेसने पक्षाचे नामकरण भारतीय नौटंकी काँग्रेस असे करावे, असे भाजपने म्हटले आहे.
आपण स्वपक्षीयांपेक्षा वेगळे आहोत, हे दाखविण्याचा राहुल गांधी यांनी प्रयत्न केला. अयशस्वी पटकथा असलेले ते नाटक होते, असे भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटले आहे.
 त्यामुळे लोकसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपल्या पक्षाचे नामकरण भारतीय नौटंकी काँग्रेस असे करावे, कारण निवडणुकीनंतर त्या पक्षाला अशा प्रकारच्या पटकथा लिहिण्यास पुरेसा अवधी मिळणार आहे, असेही ते म्हणाले.