चेन्नई : ‘मिचौंग’ चक्रीवादळ तामिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीवर मंगळवारी धडकले. चेन्नई आणि लगतच्या जिल्ह्यांना सोमवारपासून मुसळधार पावसाने तडाखा दिल्याने आतापर्यंत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १२ झाली आहे. पावसाशी संबंधित दुर्घटनांत जखमी झालेल्या अन्य ११ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मंगळवारी शहर आणि आसपासच्या भागात जलमय झालेल्या भागांत अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी नौका आणि ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला.

High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ

हेही वाचा >>> एक लाख रुपये जवळ असूनही भिकाऱ्याचा भुकेमुळे मृत्यू, जाणून घ्या कुठे घडली ही घटना?

* संपूर्ण शहरात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागात मदतकार्य करण्यासाठी जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. मंगळवारी सकाळपासून चेन्नईच्या बहुतांश भागात पावसाचा प्रभाव अत्यल्प राहिला, त्यामुळे अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्याला गती देण्यासाठी उसंत मिळाली.

* मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की राज्यात मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. चेन्नईसह नऊ वादळ-पूरग्रस्त जिल्ह्यांत एकूण ६१ हजार ६६६ मदत शिबिरे उभारली आहेत. त्यात आतापर्यंत सुमारे ११ लाख अन्नाची पाकिटे आणि एक लाख दूध पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. चेन्नई महापालिकेने इतर जिल्ह्यांतील पाच हजार अतिरिक्त कामगारांना मदतकार्यासाठी बोलावले आहे. हे कामगार ट्रॅक्टर आणि नौकांद्वारे बचाव कार्य करत आहेत.