दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्यधोरण प्रकरणात अटकेत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. मात्र कुठलाही दिलासा त्यांना मिळालेला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मेपर्यंत वाढ झाली आहे. भारतात लोकसभा निवडणूक सुरु आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर विचार करता येईल असं मत न्यायालयाने गेल्या आठवड्यात व्यक्त केलं होतं. त्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. मात्र न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मे पर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे.

अंतरिम जामीन अर्जावर काही निर्णय नाही

दिल्ली न्यायालयाने हा निर्णय दिलेला असताना अरविंद केजरीवाल यांना अंतरिम दिलासा देण्याबाबतही सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतलेला नाही. अंतरिम जामिनाच्या याचिकेवर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. अरविंद केजरीवाल यांनी कथित मद्य घोटाळा प्रकरणात जी अटक त्यांना करण्यात आली त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती तसंच अंतरिम जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi court extends cm arvind kejriwal judicial custody in ed liquor policy case till may 20 scj
First published on: 07-05-2024 at 15:02 IST