फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात आले आहेत. आजच्या प्रजासत्ताक दिनाचे ते प्रमुख पाहुणे आहेत. भारतात येताच त्यांनी मोठं लक्ष्य जाहीर केलंय. यामध्ये त्यांनी २०२३ पर्यंत फ्रान्समधील विद्यापीठांमध्ये ३० हजार विद्यार्थी असतील, असा विश्वसा व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात येताच इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एक्सवर पोस्ट केली. भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये आमंत्रित करणे ही योजना भारतासोबतचे फ्रान्सचे संबंध मजबूत करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचा एक भाग आहे, असं इमॅन्यएल मॅक्रॉन यांनी म्हटलंय. जुलै २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर त्यांनी लक्ष्य जाहीर केले होते.

हेही वाचा >> Video: भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा ऐतिहासिक सोहळा पाहिलात का? १९५० च्या आठवणींना देऊ उजाळा

“आम्ही सर्वांसाठी फ्रेंच, फ्रेंच फॉर अ बेटर फ्युचर या उपक्रमासह सार्वजनिक शाळांमध्ये फ्रेंच शिकण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करत आहोत. आम्ही फ्रेंच शिकण्यासाठी नवीन केंद्रांसह Alliance françaises चे नेटवर्क विकसित करत आहोत. आम्ही आंतरराष्ट्रीय वर्ग तयार करत आहोत. ज्या विद्द्यार्थ्यांना फ्रेंच भाषा येत नाही, त्यांना आमच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळू शकेल”, असं मॅक्रॉन म्हणाले.

“फ्रान्समध्ये शिकलेल्या माजी भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया सुव्यवस्थित केली जाणार आहे. जेणेकरून त्यांना फ्रान्समध्ये परतणं सोपं होईल. २०२५ पर्यंत २० हजार भारतीय विद्यार्थ्यांना प्रथम आकर्षित करण्याचे फ्रान्सचे उद्दिष्ट असून, २०३० पर्यंत ३० हजारच्या मोठ्या उद्दिष्ट असल्याचंही मॅक्रॉन यांनी सांगितलं. “हे एक अतिशय महत्वाकांक्षी लक्ष्य आहे, परंतु मी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कटिबद्ध आहे,” मॅक्रॉन म्हणाले.

भारतीय विद्यार्थ्यांना फ्रान्समध्ये शिक्षण घेणे सोपे व्हावे यासाठी फ्रान्स सरकारने आधीच पावले उचलली आहेत. २०१८ मध्ये त्यांनी “कॅम्पस फ्रान्स” नावाचा एक कार्यक्रम सुरू केला होता. या कार्यक्रमातून फ्रान्समध्ये शिकण्यास इच्छुक असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना माहिती मिळू शकेल. फ्रान्समध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इमॅन्युएल मॅक्रॉन भारत दौऱ्यावर

दरम्यान, भारताचा आज ७५ वा प्रजासत्ताक दिन आहे. आजच्या कार्यक्रमासाठी भारताने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन काल (२५ जानेवारी) रात्री भारतात दाखल झाले. यावेळी पंतप्रधानांनी त्यांच्याबरोबर जयपूर येथील जंतर मंतर या जागतिक वारसा स्थळाला भेट दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: France to welcome 30000 indian students by 2030 macron details ambitious plan sgk
First published on: 26-01-2024 at 10:41 IST