रात्री पडलेल्या स्वप्नाच्या भीतीने नातवानेच आजी-आजोबाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १० मे रोजी झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील रिसापाठ गावात ही घटना घडली. इंद्रनाथ असं या आरोपी नातवाचं नाव असून हत्येनंतर त्याने बिशुनपूर पोलीस ठाण्यात आत्महसमर्पण केलं.

हेही वाचा – मुस्लिम बांधवांनी ‘या’ गावात पुन्हा बांधलं वादळात उद्ध्वस्त झालेलं राम मंदिर

murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, इंद्रनाथचे आजोबा तुरी उरांव आणि आजी नयहरी देवी हे जादूटोणा करत असून ते इंद्रनाथ मारण्याचा प्रयत्न करत आहे. असे स्वप्न इंद्रनाथला दिसले होते. त्यानंतर इंद्रनाथने सकाळी उठून आजी आजोबांचा शोध घेतला. त्यावेळी ते दोघेही शेतात कामासाठी गेले असल्याची माहिती त्याला मिळाली. इंद्ननाथने थेट शेतात जाऊन लाठीने आजोबावर हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्यात तुरी उरांव यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – लग्नानंतर वर्षभरात नवऱ्याने कधीच शारिरीक संबंध बनवले नाहीत, पत्नीची पोलिसात धाव; म्हणाली, “मी जवळ गेल्यावर तो…”

इंद्रनाथ पतीवर हल्ला करत असताना आजी नयहरी देवीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, इंद्ननाथ ऐकत नसल्याचं लक्षात येताच तिने घराच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर इंद्रनाथने घरी येऊन नयहरी देवीवरही लाठीने हल्ला केला. या हल्ल्यात तिचाही मृत्यू झाला.

हेही वाचा – ३० लाखांचा टीव्ही, ५० विदेशी कुत्रे, महिंद्रा थार अन्…; ३० हजार रुपये पगार असलेल्या महिला इंजिनिअरच्या घरी सापडलं मोठं घबाड

दरम्यान, दोघांचीही हत्या केल्यानंतर बिशुनपूर पोलीस ठाण्यात आत्महसमर्पण केलं. इंद्रनाथने घटनेची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तसेच वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले.