केंद्र सरकारने सोमवारी क्रिकेटपटू ऋषभ पंतचा रस्ता अपघात आणि इतर काही गुन्ह्यांच्या बातम्यांचे टेलिव्हिजन कव्हरेज “घृणास्पद” आणि “हृदय पिळवटून टाकणारे” असल्याचे म्हटले आहे. यासोबतच टीव्ही चॅनेल्सना संबंधित कायद्यानुसार विहित केलेल्या कार्यक्रम संहितेचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व खाजगी उपग्रह वाहिन्यांना जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये पंत यांच्या कार अपघाताचे कव्हरेज, मृतदेहांचे दुःखदायक फोटो प्रसारित करणे आणि पाच वर्षांच्या मुलाला मारहाण करणे या बाबींचा उल्लेख केला आणि असे वृत्तांकन योग्य नसल्याचे म्हटले आहे. सरकारने सांगितले- दूरचित्रवाणी वाहिन्यांनी मृत व्यक्तींचे मृतदेह आणि आजूबाजूला रक्ताचे तुकडे पडलेले, जखमी व्यक्तींचे फोटो/व्हिडिओ दाखवले आहेत. स्त्रिया, लहान मुले आणि वृद्धांना निर्दयीपणे मारहाण केल्याचा क्लोज-अप शॉट्स देखील दर्शविला आहे.

byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले

सरकारने म्हटले आहे की, “शिक्षकाने एका मुलाला निर्दयीपणे मारहाण केल्याचे आणि त्याचे सतत रडणे आणि किंचाळणे असे प्रदीर्घ शॉट्स दाखवण्यात आले, जे चुकीचे आणि भयंकर आहे. या दरम्यान शॉट्स अस्पष्ट झाले नाहीत किंवा कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही. प्रसारकांनी सोशल मीडियावरून व्हिडिओ क्लिप आणि छायाचित्रे घेतल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच प्रोग्राम कोडचे पालन करून या क्लिप दाखविल्या गेल्या नाहीत.”

हेही वाचा: IND vs SL: टीम इंडियाला मोठा धक्का! संघात असूनही श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेला जसप्रीत बुमराह मुकणार, बीसीसीआयची चिंता वाढली

मंत्रालयाने टेलिव्हिजन वाहिन्यांना केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (रेग्युलेशन) कायद्यांतर्गत विहित केलेल्या प्रोग्राम कोडच्या अनुषंगाने गुन्हेगारी, अपघात आणि हिंसाचाराच्या घटनांचे अहवाल देण्यासाठी त्यांच्या सिस्टममध्ये सुधारणा आणि मजबूत करण्याचा सल्ला दिला आहे.

बीसीसीआय पंतला आयपीएलची संपूर्ण पैसे देणार

आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की जर पंतला दिल्ली कॅपिटल्सने १६ कोटी रुपयांना विकत घेतले आणि त्याला आयपीएल २०२३ साठी कायम ठेवले असेल तर पंतचा आयपीएल पगार बीसीसीआय का देईल? तर याचे कारण एक नियम आहे. वास्तविक, सर्व केंद्रीय करारबद्ध खेळाडूंचा विमा उतरवला जातो. बीसीसीआयच्या नियमांनुसार, या खेळाडूंना दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडल्यास बोर्डाकडून त्यांना पूर्ण मोबदला दिला जातो. संबंधित फ्रँचायझी नाही, तर विमा कंपनी पगार देते.

हेही वाचा: World Boxing Championship: भारताला मोठा धक्का! सहा वेळची चॅम्पियन मेरी कोमची वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधून माघार

ऋषभ पंतला बीसीसीआयने २०२१-२२ हंगामासाठी केंद्रीय करार यादीच्या श्रेणी-A मध्ये स्थान दिले आहे. यामध्ये सहभागी खेळाडूंना वार्षिक रिटेनरशिप फी म्हणून ५ कोटी रुपये मिळतात. पंत दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने त्याला ही रक्कम सरसकट देण्याचा निर्णय घेतला आहे. IPL 2022 च्या आधी दीपक चहरला दुखापत झाली होती. त्याला चेन्नई सुपरकिंग्सने १४ कोटींना विकत घेतले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या नियमांनुसार त्याला पूर्ण पैसे मिळाले.