Indian killed in Russia war zone : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी अतिआत्मविश्वासात म्हटले होते की, काही दिवसातच हे युद्ध आम्ही जिंकू. पण युक्रेनने कडवा प्रतिकार करत रशियाला तब्बल दोन वर्ष झुंझवत ठेवलं. रशियाची आतानोत मनुष्यहानी झाल्यानंतर आता इतर देशातून सैन्य भरती केली जात आहे. मागच्या वर्षी गोरखा प्रदेशातील लोकांना रशियात पाचारण केल्याची बातमी आली होती. त्यानंतर आता भारतातील तरूणही रशियाच्या युद्धभूमीवर पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. गुजरातच्या सूरतमधील हेमिल अश्विनभाई मंगुकिया (वय २३) नावाचा तरूण युक्रेनच्या हवाई हल्ल्यात मारला गेला आहे. अवघे १२वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या हेमिलने रशियात जाऊन लाखो रुपयांचा पगार मिळविण्याचे स्वप्न पाहिले होते. पण त्याच्या स्वप्नांचा युद्धभूमीत करूण अंत झाला.

रशिया-युक्रेन युद्धाची दोन वर्षे; जगभरात काय बदललं? युद्ध थांबणार का?

iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
israel withdraws troops from southern gaza
दक्षिण गाझामधून इस्रायलचं सैन्य माघारी; नेमकं कारण काय?
Attack on hotel businessman
आपटे रस्त्यावर हॉटेल व्यावसायिकावर हल्ला करणारे गजाआड; संपत्तीच्या वादातून मेहुण्याकडून मध्य प्रदेशातील पहिलवानांना सुपारी
balmaifal story, kids, adventure travel, two cats, car's bonnet, pune to devgad
बालमैफल : चेरीचॉकोचा साहसी प्रवास

हेमिलचे काका अतुल मंगुकिया यांनी या प्रकरणाची माहिती द इंडियन एक्सप्रेसला दिली आहे. ते म्हणाले की, २३ फेब्रुवारी रोजी मला हेमिलच्या वडिलांचा अश्विनभाईंचाफोन आला. त्यांना हेमिलच्या एका मित्राने, जो त्याच्यासह रशियात काम करत होता, त्याने माहिती दिली की, हेमिल मारला गेला. संपूर्ण मंगुकिया कुटुंबाला ही बातमी ऐकून धक्का बसला. त्यामुळे त्यांनी इतर माध्यमातून या बातमीची खातरजमा केली, त्यानंतर हेमिलबाबतचे सत्य त्यांना समजले.

मृत्यूच्या काही तासांआधी आई-वडिलांशी संपर्क

हेमिलने १२वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं. काही वर्षांपूर्वी हेमिल आई-वडील आणि आपला २१ वर्षांच्या छोट्या भावासह सूरतच्या कामरेज तालुक्यात आला होता. काका अतुल यांनी सांगितले की, हेमिलचा लहान भाऊ सध्या यूकेमध्ये शिक्षण घेत आहे. “हेमिललाही भावाप्रमाणेच विदेशात जाण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळेच तो १४ डिसेंबर रोजी चेन्नई मार्गे रशियात गेला होता. तिथून तो आई-वडिलांच्या संपर्कात होता. मृत्यू होण्याच्या अवघ्या दोन तासापूर्वीच त्याने घरी फोन करून संवाद साधला होता. तिकडे सर्व व्यवस्थित सुरू आहे, असे तो सतत सांगत असे. त्यामुळे आम्हाला त्याच्या मृत्यूची बातमी पचवणे अवघड जात आहे”, असेही अतुल मंगुकिया म्हणाले.

हेमिल रशियाला कसा पोहोचला?

रशियन सैन्यात हेल्पर पदावर भरती सुरू असल्याची माहिती सोशल मीडियावर मिळाल्यानंतर हेमिलने त्यासाठी प्रयत्न सुरू केले. एका एजंटच्या माध्यमातून त्याने रशियाची नोकरी मिळवून चेन्नई मार्गे रशियाला जाण्याचा निर्णय घेतला. नुकताच हेमिलला पहिला पगारही मिळाला. त्याच्या बँक खात्यात २.३ लाख रुपये जमा झाले होते, असेही अतुल यांनी सांगितले.

आता हेमिलचे कुटुंबिय भारत सरकारशी संपर्क साधत असून हेमिलचा मृत्यूस कोणती परिस्थिती कारणीभूत होती, याची माहिती मिळावी, अशी मागणी करत आहेत. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हेमिल साधारण व्हिसावर रशियात गेला होता. हेमिल रशियात कसा गेला? त्याने तिथे कोणती नोकरी स्वीकारली होती? याचा तपास आम्ही सुरू केला आहे. सध्या कुटुंबिय धक्क्यात असून ते लगेच बोलायला तयार नाहीत, आम्ही काही दिवस थांबून चौकशी सुरू करू.