नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहारात प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेविरुद्ध आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देत नाही, असे झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. सोरेनची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाला सांगितले की, सोरेन यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने २८ फेब्रुवारी रोजी निकाल राखून ठेवला होता, परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सिब्बल म्हणाले की, सोरेन यांनी २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु खंडपीठाने त्यांना दिलासा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले.

हेही वाचा >>> जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemant soren approaches supreme court against ed arrest zws
First published on: 25-04-2024 at 02:25 IST