इस्रायलने पूर्व जेरुसलेमसह पॅलेस्टाईन व्याप्त प्रदेश आणि सीरियन गोलानमध्ये ताबा मिळवला आहे. या कृत्याचा निषेध करत संयुक्त राष्ट्राने गुरुवारी (९ नोव्हेंबर) इस्रायलविरोधात मसुदा तयार केला. संयुक्त राष्ट्राच्या या ठरावाच्या बाजुने तब्बल १४५ देशांनी मतदान केलं. यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारताने संयुक्त राष्ट्रात इस्रायलविरोधी भूमिका घेतली आहे.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्राने “पूर्व जेरुसलेमसह सीरियन गोलान आणि पॅलेस्टाईन व्याप्त प्रदेशातील इस्रायली वसाहती” या शीर्षकाचा ठराव मांडला होता. हा ठराव प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. भारतासह १४५ देशांनी ठरावाच्या बाजुने मतदान केलं. तर सात देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं. कॅनडा, हंगेरी, इस्रायल, मार्शल आयलंड, फेडेरेटेड स्टेट्स ऑफ मायक्रोनेशिया, नाउरू आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं. तर १८ देश मतदानापासून दूर राहिले.

Will Sharad Pawar NCP merge with Congress
शरद पवारांची ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसमध्ये विलीन होणार का? सोनियाविरोधी भूमिकेचं काय?
Kangana Ranaut
“भारताला हिंदू राष्ट्र बनवणार”, कंगना रणौतचं विधान; म्हणाली, “पाकिस्तानला इस्लामिक रिपब्लिक…”
BJP confused by Prime Minister Narendra Modi appeal regarding Shiv Sena NCP
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाने सारेच संभ्रमात; नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीने ‘रालोआ’त यावे!
Who will win in Baramati NCP state president Sunil Tatkare gave the answer
बारामतीमध्ये कोण जिंकणार? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले उत्तर…
praful patel
भाजप नव्हे, काँग्रेसमुळेच राष्ट्रवादी नेत्यांची बदनामी
Who is Sadiq Khan
लंडनमधील पाकिस्तानी वंशाचे महापौर सादिक खान कोण आहेत?
Nepal currency note
नोट प्रिंटिंग प्रकरणावरून भारताने नेपाळला सुनावलं; परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर म्हणाले, “हा निर्णय…”
original shivsena and ncp
खरी शिवसेना, खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? १५ मतदारसंघांतील मतकौल निर्णायक ठरणार

हेही वाचा- “आम्हाला गाझावर अमर्यादित काळासाठी…”, हमासविरोधातील युद्धादरम्यान वरिष्ठ इस्रायली अधिकाऱ्याचं वक्तव्य

यूएनमधील ठरावावरील मतदानाचा फोटो शेअर करत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले म्हणाले, “भारताने ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने मला खूप आनंद झाला. इस्रायली स्थायिकांकडून पॅलेस्टाईनवर घेतलेला ताबा बेकायदेशीर आहे. इस्रायलचा वर्णभेद आताच संपला पाहिजे.”

हेही वाचा- भूतानने आसामच्या बंडखोर गटांविरुद्ध सुरू केलेले ऑपरेशन ‘ऑल क्लीअर नक्की’ काय होते?

विशेष म्हणजे गेल्या महिन्यात जॉर्डनने सादर केलेल्या ठरावावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत मतदान करण्यात आलं होतं. या ठरावाद्वारे इस्रायल-हमास संघर्षात तत्काळ मानवतावादी युद्धबंदीची मागणी करण्यात आली होती. या मतदानाला भारत गैरहजर राहिला. कारण संबंधित ठरावात हमास दहशतवादी संघटनेचा कसलाही उल्लेख केला नव्हता. १२० देशांनी या ठरावाच्या बाजुने मतदान केलं. तर १८ देशांनी विरोधी भूमिका घेतली. भारतासह ४५ देशांनी तटस्थ भूमिका घेत मतदान करणं टाळलं.