कर्नाटकमधील हासन लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडल प्रकरणामुळे कर्नाटकमधील राजकीय वर्तुळात खळबळ माजली. प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप होताच, त्यांनी भारतातून पळ काढला. त्यानंतर त्यांचे वडील एचडी रेवण्णा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. नुकतीच त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. यानंतर आता माजी पंतप्रधान आणि प्रज्ज्वल रेवण्णा यांचे आजोबा आणि एचडी रेवण्णा यांचे वडील एचडी देवेगौडा यांची प्रतिक्रिया पहिल्यांदाच समोर आली आहे. प्रज्ज्वल रेवण्णावर गुन्हा सिद्ध झाल्यास कायद्यानुसार जी काय शिक्षा असेल ती द्यावी, असे त्यांनी सांगितले.

“मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा

prajwal revanna sex scandal case marathi news
अखेर प्रज्वल रेवण्णा समोर आला! सेक्स स्कँडल प्रकरणी Video जारी करून म्हणाला, “या सगळ्याला पूर्णविराम…”
prajwal revanna case
प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स टेप प्रकरणात मोठी अपडेट; खासदार रेवण्णाला उद्या भारतात आणले जाणार
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Prajwal Revanna
Sex Tape Scandal : प्रज्वल रेवण्णा जर्मनीहून रवाना, भारतात आल्यानतंर तपास यंत्रणांना सहकार्य करणार?
Abhishek Nayar Statement on Sex in cricket
‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”
karnataka obscene videos case
कर्नाटक सेक्स टेप प्रकरण: प्रज्ज्वल रेवण्णाला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”

शनिवारी (दि. १८ मे) देवेगौडा यांचा ९१ वाढदिवस आहे. यानिमित्ताने माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. प्रज्ज्वल रेवण्णा सारख्या गुन्हेगाराला मोकळे सोडता कामा नये, असेही ते म्हणाले. मात्र आपला मुलगा आणि प्रज्ज्वलचे वडील एचडी रेवण्णा यांच्यावर लावलण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, असेही ते म्हणाले.

देवेगौडा म्हणाले की, एचडी कुमारस्वामी यांनी या विषयाबाबत अनेकदा कुटुंबाच्या वतीने माध्यमांशी संवाद साधला आहे. कायद्यानुसार प्रज्ज्वल रेवण्णावर कारवाई करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. एचडी रेवण्णावर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या होत्या, हे आता लोकांनाही कळले आहे.

२७ एप्रिल पासून एचडी देवेगौडा हे बंगळुरूमधील निवासस्थानाच्या बाहेर आलेले नाहीत. दुसऱ्या टप्प्यात हासन लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी प्रज्ज्वल रेवण्णासाठी प्रचार केला होता. त्यानंतर सेक्स स्कँडल प्रकरण बाहेर आले, तेव्हापासून देवेगौडा घराच्या बाहेर पडले नव्हते. २६ एप्रिल रोजी देवेगौडा यांनी हासन जिल्ह्यात मोडणाऱ्या मतदान केंद्रावर मतदान केले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रज्ज्वल रेवण्णाशी संबंधित सेक्स व्हिडीओ बाहेर आले आणि राज्यात खळबळ उडाली.

प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल बाहेर काढणाऱ्या भाजपा नेत्याविरोधातही लैंगिक छळाची तक्रार, पोलिसांनी घेतलं ताब्यात

४ मे रोजी एचडी रेवण्णा यांना प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरण आणि अपहरण अशा खटल्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर १४ मे रोजी त्यांना जामीन मंजूर झाला. देवेगौडा म्हणाले की, प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरणात आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने त्याचे समर्थन केलेले नाही. या प्रकरणात अनेक लोक गुंतलेले आहेत, असा आमचा आरोप आहे. पण यावेळी आम्ही कुणाचे नाव घेऊ इच्छित नाही. जे जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि पीडित महिलांना न्याय मिळावा असेही ते म्हणाले.