काठमांडू : प्रख्यात ज्येष्ठ गिर्यारोहक शेर्पा कामी रिता यांनी मंगळवारी २८ व्या वेळी माऊंट एव्हरेस्ट सर करून, स्वत:चाच विक्रम मोडला. जगातील या सर्वोच्च पर्वतशिखरावर त्यांनी आठवडाभरात दुसऱ्यांदा यशस्वी चढाई केली आहे.

५३ वर्षीय विक्रमवीर गिर्यारोहण मार्गदर्शक कामी शेर्पा मंगळवारी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी आठ हजार ८४८.८६ मीटर उंचीचे हे हिमशिखर सर केल्याची माहिती या मोहिमेचे संयोजन करणाऱ्या ‘सेव्हन समिट ट्रेक एक्सपिडिशन’चे व्यवस्थापक छांग दावा शेर्पा यांनी दिली. या उन्हाळी मोसमात कामी रिता यांनी आठवडाभरात दुसऱ्यांदा हे शिखर सर केले. १७ मे रोजी त्यांनी २७ व्या वेळी माऊंट एव्हरेस्ट सर केले होते. हे सर्वोच्च शिखर सर्वाधिक वेळा सर करण्याचा कामी रिता यांच्या विक्रमाशी ज्येष्ठ शेर्पा पासांग दावा यांनी बरोबरी केली होती. मात्र कामी रिता यांनी मंगळवारी २८ व्या वेळी एव्हरेस्ट सर करून सर्वाधिक वेळा एव्हरेस्टवीर होण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर कायम ठेवला.

Tristan Stubbs fielding video viral in DC vs GT Match
DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल
LSG fan video viral at Chepauk Stadium
CSK vs LSG : चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर लखनऊच्या ‘त्या’ चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, VIDEO होतोय व्हायरल
Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र

विक्रमवीराबाबत..

पूर्व नेपाळमधील सोलुखुंबू जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कामी रीता यांनी १३ मे १९९४ रोजी प्रथम एव्हरेस्ट सर केले. ते काठमांडूस्थित ‘सेव्हन समिट ट्रेक्स’मध्ये वरिष्ठ गिर्यारोहण मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यांनी आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची माऊंट के २, माऊंट ल्होत्से, माऊंट मनास्लू आणि माऊंट चो ओयू इतर प्रसिद्ध शिखरेही सर केली आहेत.