दिल्ली लगत असलेल्या गुरुग्राममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुरुग्रामच्या सेक्टर १०९ मधील द्वारका एक्स्प्रेसमधील २२ मजली इमारतीचा काही भाग तिथे बांधकाम सुरू असताना कोसळला. या अपघातात दोन जणांचा मृत्यु  झाला आहे. इमारतीचा काही भाग कोसळला असता गोधळ उडाला.

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी | Worker died after crane hook fell on his head
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी

या अपघाताची माहीती मिळताच गुरुग्राम पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आहेत. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली चार कुटुंब अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुग्राममधील द्वारका एक्सप्रेसजवळील चिंतल पॅराडिसो सोसायटीच्या डी टॉवरच्या सहाव्या मजल्यावर बांधकाम सुरू होते. याच दरम्यान ब्लॉक डी टॉवर ४ च्या दिवाणखान्याचा स्लँब अचानक कोसळला. व त्यामुळे सहाव्या ते पहिला मजल्यापर्यंत स्लॅब कोसळून खाली आला.