ईदनिमित्त अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी सांगितले की, जगभरातील मुस्लिम हिंसाचाराचे बळी ठरत आहेत. या कार्यक्रमाला फर्स्ट लेडी जिल बिडेन, मस्जिदचे इमाम मोहम्मद डॉ. तालिब एम. शरीफ आणि पाकिस्तानी गायक आणि संगीतकार अरुज आफताब यांचीही उपस्थिती होती. ते म्हणाले, “आज हा पवित्र दिवस साजरा करण्यास असमर्थ असलेल्या लोकांचीही आठवण येते. यामध्ये उइघुर आणि रोहिंग्या आणि दुष्काळ, हिंसाचार, संघर्ष आणि रोगराईचा सामना करणाऱ्या सर्वांचा समावेश आहे.”

“इस्लामोफोबियामुळे मुस्लिमांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अडचणींचा सामना करूनही मुस्लिम समाजातील लोक अमेरिकेला मजबूत बनवण्याचे काम करत आहेत”, असंही त्य व्हाईट हाऊसमध्ये ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात जो बायडेन म्हणाले. “आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या प्रभारी वाणिज्य दूतावासाच्या पदावर प्रथमच एका मुस्लिमाची नियुक्ती केली आहे. हे खूप महत्त्वाचे आहे कारण आज जगभरात अनेक मुस्लिम हिंसाचाराचे बळी होत असल्याचे आपण पाहत आहोत. कुणालाही त्यांच्या धार्मिक श्रद्धेसाठी त्रास देऊ नये.”

ईदनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर केलेल्या ट्विटमध्ये जो बिडेन म्हणाले, “आज रात्री व्हाईट हाऊसमध्ये ईद साजरी करताना जिल आणि मला अत्यंत सन्मानित वाटत आहे आणि आम्ही हा सण साजरा करणार्‍या जगभरातील प्रत्येकाला ईदच्या शुभेच्छा देतो.”