दोन दिवसांच्या गुजरात भेटीवर आलेले चीनचे भारतातील उच्चायुक्त लियू युफा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीयेत. मोदी हे स्टार राजकारणी असल्याचे युफा यांनी म्हटलंय.
जानेवारीमध्येच युफा मुंबईमध्ये उच्चायुक्त म्हणून रुजू झाले. गुजरातमध्ये उत्पादकांच्या वार्षिक संमेलनासाठी ते अहमदाबादमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मोदी यांची भेट घेतली. गुजरातमधील विकासकामे पाहून युफा प्रभावित झाले आहेत. आर्थिक विकास, पायाभूत सुविधा या क्षेत्रात गुजरात इतर राज्यांपेक्षा नक्कीच पुढे असल्याचे प्रशस्तीपत्रक युफा यांनी दिले. चिनी पर्यटक भारतामध्ये येण्यास फारसे उत्सुक नसतात. मात्र, गुजरातमधील प्रगती पाहण्यासाठी ते नक्कीच येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
औषधनिर्माण, माहिती-तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग, ऊर्जा, पायाभूत सुविधा, पर्यटन, कृषी इत्यादी क्षेत्रात चिनी गुंतवणुकीसाठी भारतामध्ये भागीदार शोधण्याचे काम आपण करीत असल्याचेही युफा यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2013 रोजी प्रकाशित
मोदी हे तर ‘स्टार’ राजकारणी : चीनच्या उच्चायुक्तांकडून कौतुक
दोन दिवसांच्या गुजरात भेटीवर आलेले चीनचे भारतातील उच्चायुक्त लियू युफा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीयेत.

First published on: 13-04-2013 at 12:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi a political star headed for delhi says chinese envoy