पीटीआय, नवी दिल्ली

देवतांच्या नावावर मते मागितल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहा वर्षे निवडणुका लढविण्यास अपात्र करावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. न्या. सचिन दत्ता यांनी सांगितले की, ही याचिका निराधार असून चुकीची आहे. याचिकाकर्त्याचे अनेक गैरसमज झाल्याचे याचिकेद्वारे दिसून येते. दिल्लीतील वकील आनंद जोंधळे यांनी देवता आणि प्रार्थनास्थळांच्या नावावर मते मागितल्याबद्दल मोदींविरुद्ध कारवाई करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. यापूर्वी त्यांनी निवडणूक आयोगाकडेही याबाबत तक्रार केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petition against prime minister narendra modi seeking disqualification from contesting elections for six years for seeking votes in the name of deities rejected amy
First published on: 30-04-2024 at 05:56 IST