आधारकार्ड क्रमांकसाठी ३१ मार्चची अंतिम मुदत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे इपीएफओमधील रक्कम आता मे महिन्यापासून ऑनलाइन काढता येणार आहे. आता यापुढे हे व्यवहार कागदोपत्री न होता ऑनलाइन होतील त्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या गुंतवणूकदारांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. भविष्य निर्वाह वेतन धारकांनी त्यांची आधार कार्डे किंवा त्याचा क्रमांक इपीएफओला सादर करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१७ आहे, पेन्शन व बँक खाती आधारने जोडली जाणार आहेत तरच रक्कम मिळणार आहे. आधारकार्ड क्रमांकामुळे या व्यवहारात पारदर्शकता येणार आहे.

दरवर्षी रकमेच्या दाव्यांसाठी एक कोटी अर्ज या इपीएफओ संस्थेकडे येत असतात, त्यात  पैसे काढणे, नोकरी संपल्यामुळे पेन्शन निश्चित करणे, समूह विमा मिळवणे यासाठी वेगवेगळे अर्ज येतात. आता सर्व क्षेत्रीय कार्यालये केंद्रीय सव्‍‌र्हरला जोडण्याचे काम चालू आहे. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा सर्व प्रकारच्या अर्जाकरिता दिली जाणार आहे. त्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी काढण्याच्या ऑनलाइन अर्जाचीही सोय आहे व मे महिन्यापासून ही सुविधा सुरू होत आहे असे इपीएफओचे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त व्ही.पी.जॉय यांनी सांगितले. ते म्हणाले की, सर्व कार्यालये आता केंद्रीय सव्‍‌र्हरला जोडली जाणार असून त्याला दोन महिने लागतील त्यानंतर सर्व प्रकारचे अर्ज ऑनलाइन भरता येतील. काही तासात रकमेचे दावे पूर्ण करण्याचे इपीएओचे उद्दिष्ट आहे. इपीएफओ पैसे काढण्याचा दावा तीन तासात पूर्ण केला जाणार आहे. सर्व दाव्यांचा विचार करता ते अर्जानंतर वीस दिवसात पूर्ण झाले पाहिजेत असे अपेक्षित आहे. इपीएफओने त्यांची पन्नास कार्यालये केंद्रीय सव्‍‌र्हरला जोडली आहेत. आता १२३ कार्यालये अजून जोडली जाणार आहेत. त्यामुळे वर्गणीदारांना ऑनलाईन सेवा देता येईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Provident fund
Show comments