“मी वाराणसीत गेलो होतो. रात्रीची वेळ होती. तिथे बाजा वाजताना मी पाहिला. बाजाच्या संगीतावर युपीचं भविष्य रस्त्यात नाचताना मी वाराणसीत बघितलं”, अशी टीका राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आज वाराणसीमध्ये अमूल प्लांट कॉम्प्लेक्समध्ये १३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ३५ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान म्हणाले, “राहुल गांधींनी मोदींना शिव्या देत दोन दशके घालवली, पण आता देवासारखे लोक असलेल्या उत्तर प्रदेशातील तरुणांविरोधात ते बोलत आहेत. जे स्वतः नशेत आहेत ते उत्तर प्रदेश आणि माझ्या काशीच्या मुलांना नशाखोर म्हणत आहेत. अहो अतिपरिवारवादी, काशीचा तरुण उत्तर प्रदेशच्या विकासात व्यस्त आहे, तो आपले समृद्ध भविष्य लिहिण्यासाठी सर्वतोपरी मेहनत करत आहे. इंडिया आघाडीने उत्तर प्रदेशातील तरुणांचा केलेला अपमान कोणीही विसरू शकणार नाही.”

हेही वाचा >> पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात युवक मद्याच्या नशेत रस्त्यावर नाचताना पाहिले, राहुल गांधींची टीका

मोदी म्हणाले, “हे अतिपरिवारवाद्यांचे वास्तव आहे. कुटुंबातील सदस्यांना नेहमीच युवा शक्तीची भीती वाटते. तरुण प्रतिभांना घाबरतात. सामान्य तरुणाला संधी मिळाली तर ते सर्वत्र आव्हान देतील, असं त्यांना वाटतं. त्यांना तेच लोक आवडतात जे रात्रंदिवस त्यांचा जयजयकार करत असतात. काँग्रेस पक्षावर निंदा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “परिवारवाद’, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे उत्तर प्रदेश अनेक दशकांपासून विकासात मागे राहिला आहे.”

आर्थिक महसत्ता बनेल

पंतप्रधान म्हणाले, “मोदींचा तिसरा कार्यकाळ हा संपूर्ण जगात भारताच्या सत्तेचा सर्वात महत्त्वाचा काळ असणार आहे. हा सर्वात तीव्र कार्यकाळ असणार आहे. यामध्ये भारतातील प्रत्येक आर्थिक, सामाजिक, सामरिक, सांस्कृतिक क्षेत्र नवीन उंची गाठेल. गेल्या दहा वर्षांत भारत ११ व्या क्रमांकावरून पाचवी आर्थिक शक्ती बनला आहे. येत्या पाच वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनेल. तसंच, मी हमी दिली आहे की दुर्लक्षित असलेल्या पूर्व भारताला विकसित भारतासाठी प्रगतीचे इंजिन’ बनवतील, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Says he who has lost his mind pm modi on rahul gandhis varanasi remark sgk
First published on: 23-02-2024 at 21:21 IST