चंदीगडमध्ये आम आदमी पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत चंदीगडमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या मतमोजणीत आपचे जवळपास ८ मते अवैध ठरवण्यात आली होती. परंतु, ही मते आता वैध ठरवून चंदीगडच्या महापौर पदी आपचा उमेदवार घोषित करण्यात आला आहे. पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. लाईव्ह लॉने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

चंदीगड महापौरपदासाठी पुन्हा निवडणूक न घेता सध्याच्या मतपत्रिकांच्या आधारेच निकाल जाहीर केला जाईल, असं सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर, ३० जानेवारीला झालेल्या मतदान आणि मतमोजणीची संपूर्ण चित्रफीत आणि मतपत्रिकांचे मंगळवारी अवलोकन करण्यात आले. यावेळी अवैध ठरवलेली आठही मते वैध ठरवून पुन्हा मतमोजणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. ही मतमोजणी पुन्हा झाल्यानंतर आपचे नगरसेवक कुलदीप कुमार यांचा विजय झाला आहे.

High Court reprimanded the government in Nagpur Reform Scheme Plot Scam
१७ वर्षांपासून एका फाईलवर कसे बसू शकता? भूखंड घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले
Special Court decision to grant bail to Arvind Kejriwal
केजरीवाल यांना जामीन; विशेष न्यायालयाचा निर्णय, ४८ तासांच्या स्थगितीसही नकार
juvenile justice board chief magistrate m p pardeshi transfer after period complete pune
बाल न्याय मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकाऱ्यांची बदली
demanding money in return for military service CBI has filed a case against Lieutenant Colonel
पुणे : लष्करात भरतीच्या बदल्यात पैशांची मागणी; लेफ्टनंट कर्नलवर सीबीआयकडून गुन्हा
supreme court denied arvind kejriwal extension of interim bail
अन्वयार्थ : ‘विशेष वागणुकी’ला मुदतवाढ नाही!
Sachin waze, Extortion case,
खंडणी प्रकरण : दोन वर्षांपासून कारागृहात असलेले सचिन वाझे जामिनासाठी उच्च न्यायालयात, सीबीआयला भूमिका स्पष्ट करण्याच आदेश
Arvind Kejriwal
२ जूनला अरविंद केजरीवाल यांची ‘तुरुंग’वापसी अटळ; अंतरिम जामीन वाढवण्याची याचिका नाकारली!
Anand sharma postal ballet request
‘या’ काँग्रेस नेत्याची पोस्टल बॅलेटद्वारे मतदनाची विनंती सर्वोच्च न्यायालयाने नाकारली; काय आहेत कारणं?

याचिकाकर्त्याच्या बाजूने टाकण्यात आलेल्या आठ मतपत्रिकांचा विपर्यास करण्याचा अनिल मसिह यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे खंडपीठाने नमूद केले. “पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी मतपत्रिकेत छेडाछाड झाल्याचे मान्य केले”, असंही खंडपीठाने नोंदवलं.

“पीठासीन अधिकाऱ्याचे वर्तन दोन पातळ्यांवर घसरले आहे. प्रथमतः त्यांच्या वर्तणुकीमुळे, त्यांनी महापौर निवडणुकीचा मार्ग बेकायदेशीरपणे बदलला आहे. दुसरे म्हणजे, या न्यायालयासमोर खोटे निवेदन दिले, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले पाहिजे”, असंही खंडपीठाने म्हटलं.

३० जानेवारी रोजी झालेल्या चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला होता. या निवडणुकीत इंडिया आघाडीतील मित्र पक्षांचा पराभव झाला होता. निवडणूक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांच्यावर फसवणूक आणि बनावटगिरी केल्याचा आरोप करत AAP ने सुप्रीम कोर्टात नव्याने मतदानाची मागणी केली. अनिल मसिह हे सीसीटीव्हीकडे पाहताना मतपत्रिकेवर टिक करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केली होती टीका

चंदीगडमध्ये झालेली निवडणूक ही घोडेबाजार असल्याची टीकाही सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यामुळे आता अनिल मसिह यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.