एपी, सिडनी

सिडनीतील एका वर्दळीच्या शॉपिंग सेंटरमध्ये सहा जणांना चाकूने भोसकून ठार करणाऱ्या हल्लेखोराची पोलिसांनी रविवारी ओळख पटवली. या इसमाला एका महिला पोलिसाने नंतर गोळय़ा घालून ठार मारले होते.शहराच्या पूर्व उपनगरातील बाँडी जंक्शनवरील वेस्टफील्ड शॉपिंग सेंटरमध्ये शनिवारी दुपारी झालेल्या या हल्ल्यासाठी जोएल काऊची (४०) हा जबाबदार होता, असे न्यू साऊथ वेल्स (एनएसडब्ल्यू) पोलिसांनी सांगितले.

Israel succeeded in preventing an unexpected attack by Iran
इराणचा अनपेक्षित हल्ला रोखण्यात इस्रायल यशस्वी; इराणनी सोडलेली ३०० हून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे नष्ट
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता

काऊची याला अनिर्दिष्ट मानसिक समस्या होती आणि पोलीस तपासकर्त्यांना हा दहशतवादाशी संबंधित हल्ला असल्याचे वाटत नाही, असे एनएसडब्ल्यूचे सहायक पोलीस आयुक्त अँथनी कुक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘आम्ही हल्लेखोराची संपूर्ण माहिती घेत आहोत, मात्र हा मुद्दा संबंधित व्यक्तीच्या मानसिक आरोग्याशी संबंधित असल्याचे या टप्प्यावर आम्हाला निश्चितपणे वाटते’, असे ते म्हणाले.