Premium

जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ल्यात तीन ठार; हल्लेखोर हमासचे हस्तक 

पॅलेस्टिनी बंदूकधाऱ्यांनी एका बस थांब्यावर केलेल्या बेछूट गोळीबारात गुरुवारी तीन इस्रायली नागरिक ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले. हल्लेखोर ‘हमास’ या दहशतवादी संघटनेचे हस्तक असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Three killed in terrorist attack in Jerusalem
(इस्रायलने गुरुवारी वेस्ट बँक येथून पॅलेस्टिनी नागरिकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अहेद तामिमि यांची सुटका केली. सुटके नंतर त्यांनी आपल्या आईची गळाभेट घेतली.)

पीटीआय, जेरुसलेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅलेस्टिनी बंदूकधाऱ्यांनी एका बस थांब्यावर केलेल्या बेछूट गोळीबारात गुरुवारी तीन इस्रायली नागरिक ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले. हल्लेखोर ‘हमास’ या दहशतवादी संघटनेचे हस्तक असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

स्थानिक वेळेनुसार सकाळी ७.४०च्या सुमारास ही घटना घडली. जेरुसलेमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वेझमन स्ट्रीटवर एका वाहनातून दोन पॅलेस्टिनी बंदूकधारी उतरले आणि त्यांनी बसथांब्यावर उभ्या असलेल्या लोकांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात तीन नागरिक जागीच ठार झाले, तर सहा जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी कर्तव्यावर नसलेले दोन इस्रायली सैनिक होते. त्यांनी आणि एका शस्त्रधारी नागरिकाने दहशतवाद्यांच्या दिशेने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.

 इस्रायल आणि हमास

 इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार हल्लोखोरांची नावे मुराद आणि इब्राहिम अशी आहेत. ते सख्खे भाऊ असून त्यांचे वास्तव्य पूर्व इस्रायलमध्ये आहे. हे दोघेही हल्लेखोर हमास या दहशतवादी संघटनेचे आहेत. दहशतवादी कृत्यांबद्दल त्यांना पूर्वी शिक्षाही झाली होती. इस्रायल आणि हमासदरम्यान तात्पुरत्या युद्धविरामाची मुदत सात दिवस करण्यावर मतैक्य झाल्यानंतर लगेचच हा हल्ला करण्यात आला.

हेही वाचा >>>Exit Polls 2023 Result: कोण जिंकणार लोकसभेची सेमीफायनल? काय आहेत एग्झिट पोलचे अंदाज?

युद्धविरामाला मुदतवाढ

मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या कतारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार इस्रायल-हमासदरम्यानचा तात्पुरता युद्धविराम आणखी एक दिवस वाढवण्यात आला आहे. गुरुवारी युद्धविराम संपण्याआधी ही घोषणा करण्यात आली.

१६ ओलिसांची सुटका

तात्पुरत्या युद्धविरामाच्या सहाव्या दिवशी, गुरुवारी सकाळी हमासने गाझामधून १६ ओलिसांची सुटका केल्यानंतर त्या बदल्यात इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांच्या एका गटाची मुक्तता केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three killed in terrorist attack in jerusalem amy

First published on: 01-12-2023 at 03:21 IST
Next Story
अमेरिकेचे आरोप ही ‘चिंतेची बाब’! हत्येच्या कथित कटावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया