तेलंगणात आज मोठा अपघात घडला आहे. वायुसेनेचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दोन वैमानिक गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत विमान कोसळताच विमानाला आग लागली.

तेलंगणातील हैदराबाद येथील एअर फोर्स अकादमीमध्ये प्रशिक्षणादरम्यान सकाळी ८.५५ च्या सुमारास हा अपघात झाला. जखमी वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एक कॅडेटचा समावेश आहे.

Ukraine Russia war takes a new turn
युक्रेन-रशिया युद्धाला नवे वळण; अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या लष्करी तळांवर हल्ले
importance of rest for airline pilots
विश्लेषण : वैमानिकांची विश्रांती का महत्त्वाची?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न

हैदराबाद येथे Pilatus PC 7 Mk II प्रशिक्षण विमान कोसळले. या विमानात दोघेजण होते. एकजण प्रशिक्षक आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिक त्यात होते. विमान कोसळलात विमानाला आग लागली. त्यामुळे हे विमान जळून खाक झाले. दरम्यान, या विमानाला लागलेली आग विझवण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसंच, या अपघातात दोघे जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या अपघाताप्रकरणी शोध प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसंच, या अपघाताचं कारणही अद्याप समजू शकलेले नाही.