मथुरा जिल्ह्यातील बरसाना येथील मंदिरात एका ५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मंदिराचा स्वयंपाकी आणि सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

बलात्कारपीडित महिला ही पश्चिम बंगालची आहे. मंदिरात ती झोपली असताना दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मंदिरातील स्वयंपाकी आणि सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक आदित्य शुक्ला यांनी दिली.

cleaning dirt by hand, banning laws,
हाताने मैला साफ करण्याची कृप्रथा : बंदी घालणाऱ्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, उच्च न्यायालयाचे आदेश
nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
pleas challenging maratha quota in bombay hc
मराठा आरक्षण : प्रवेश, नोकऱ्यांवर टांगती तलवार; नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन – उच्च न्यायालय

पीडित महिला गेल्या आठवड्यात कोलकाताहून बरसाना येथे आली होती. ११ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास ती या मंदिरात झोपली असताना दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. संशयित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ही घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.