JCB Yellow Colour Fact: कोणत्याही इमारतीच्या कन्स्ट्रक्शन साईटवर गेलात की, तिथे मोठमोठ्या मशीन पाहायला मिळतात. त्यात खोदकामासाठी वापरण्यात येणारं जेसीबी (JCB) तर सर्वांनीच पाहिलं असेल. अवजड सामान उचलण्यापासून मोठे खड्डे खणण्यापर्यंत जेसीबीचा वापर केला जातो. जेसीबी आल्यापासून सगळी कामं सोपी झाली आहेत. जेसीबी वाहन अगदीच लोकप्रिय आहे. एखाद्या ठिकाणी जेसीबीचं काम सुरू झालं, तर ते पाहायला लोक जात असतात. पण, जगभरात वापरल्या जाणाऱ्या या जेसीबी मशीनचा रंग पिवळाच का असतो. तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? आपण इतर काही मशीन्स बघितल्या, तर आपल्याला लक्षात येईल की, त्यांत वेगवेगळे रंगही असतात. पण, जेसीबीला फक्त पिवळाच रंग का दिला जातो? आज आम्ही तुम्हाला यामागचं कारण सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर, आपण ज्या मशीनला जेसीबी म्हणता, त्या मशीनचं नाव जेसीबी नाही; जेसीबी हे मशीन तयार करणाऱ्या एका कंपनीचं नाव असून, कंपनीचे मालक व ब्रिटिश अब्जाधीश जोसेफ सिरिल बामफोर्ड यांचं नाव आहे. त्यांच्या नावाचा शॉर्ट फॉर्म जेसीबी, असा होतो. या नावावरूनच कंपनीचे नावही जेसीबी, असे ठेवण्यात आले आहे. तर या मशीनचं खरं नाव ‘बॅकहो लोडर’ आहे. परंतु, आज प्रत्येक जण त्याला जेसीबी (JCB) याच नावानं ओळखतो.

(हे ही वाचा : रेल्वेच्या दाराजवळची खिडकी इतर खिडक्यांपेक्षा वेगळी का असते माहितीये? ‘हे’ आहे यामागील खरं कारण… )

अनेक अवजड मशीनची निर्मिती जेसीबी कंपनी करते. ही मशीन खासकरून बांधकाम क्षेत्रात वापरली जाते. बॅमफोर्डने १९४५ मध्ये या कंपनीची स्थापना केली आणि कंपनीनं १९४५ साली अशा मशीनचं उत्पादन सुरू केलं. त्याच्या पहिल्या म्हणजेच सुरुवातीच्या मॉडेलमध्ये ट्रॉली बनवण्यात आली होती. जेसीबीनं १९४५ नंतर वेळोवेळी नवनवीन मशीनचं उत्पादन केलं आणि अनेक बदल केले.

कंपनीनं प्रथम तयार केलेल्या बॅकहो लोडरला निळा व लाल रंग दिला होता. परंतु, कालांतरानं या रंगात बदल करून पिवळा रंग देण्यात आला. तर आता प्रश्न असा, की पिवळाच का… लाल, निळा किंवा इतर कोणताही रंग का नाही? जेसीबीचा पिवळा रंग असण्यामागे एक विशेष कारण आहे. जेसीबीला पिवळा रंग देण्यामागे सुरक्षितता आहे. बांधकामाच्या ठिकाणी काम सुरू असताना लांबून, अंधारात, धुक्यात किंवा धूळ, माती असताना, रस्त्यावर काम सुरू असतानासुद्धा हे मशीन सहज दिसून यावं. त्याला कोणी धडकू नये, म्हणूनच या मशीनला पिवळा रंग देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या कामगारांचे हेल्मेटदेखील पिवळ्या रंगाचे असतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did you know why is the color of jcb always yellow know the reason behind it pdb
First published on: 30-01-2024 at 17:35 IST