आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. गणेशोत्सव संपला की नवरात्र, त्यानंतर दसरा आणि दिवाळी.. दिवाळीच्या सुट्टीत कुठे जायचे याचे आतापासूनच बेत शिजू लागले असतील. रिझव्‍‌र्हेशनसाठी रांगाही लावून झाल्या असतील. परंतु असेही काही पर्याय आहेत की तुम्ही कोणतेही रिझव्‍‌र्हेशन न करता, स्वतच्या आवडीने-सवडीने, कुठेही, कधीही, स्वत: गाडी चालवत जाऊ शकता.. तरुणांमध्ये हल्ली अशा सेल्फ ड्राइव्ह ट्रॅव्हलचा ट्रेण्ड वाढतो आहे.. काय आहे सेल्फ ड्राइव्ह त्याबद्दल थोडंसं..

07 सुट्टीत कुठे जायचे म्हटले की दोन-तीन महिने आधी रिझव्‍‌र्हेशन केलेले असणे आवश्यकच असते. त्यामुळे फार आधीपासूनच सुट्टीच्या दिवसांचे प्लॅिनग करावे लागते. मात्र, अलीकडे ट्रेण्ड बदलू पाहतोय. स्वतच्या सोयीने सुट्टीत भटकंती करण्याकडे कल वाढू लागलाय. त्यासाठी स्वतची गाडीच हवी, असेही नाही. गाडी तासाच्या, दिवसाच्या, महिन्याच्या भाडेबोलीवर घ्यायची आणि ड्राइव्ह करत इच्छित स्थळ गाठायचे असे आता होऊ लागले आहे. यातून दुहेरी आनंद मिळतो, एक म्हणजे, ड्रायिव्हगचे समाधान आणि दुसरे म्हणजे कोणताही खोळंबा न होता इच्छित स्थळी जाता येणे.. तुम्हाला हवी तशी गाडी बुक करायची आणि निघायचं.. कार्झऑनरेंट आणि माइल्स ही दोन संकेतस्थळे या प्रकारच्या सेवा देण्यात आघाडीवर आहेत..
कार्झऑनरेंट या संकेतस्थळावर जाऊन ग्राहकांनी त्यांची आवडीची कार निवडायची आणि तुमच्या सोयीनुसार ती बुक करायची. तुमच्या वेळेत गाडी तुमच्याकडे हजर असणार. तास, दिवस आणि महिना अशा पद्धतीने तिचे भाडे असते. कार्झऑनरेंट ७५ रुपये प्रतितासापासून प्रतिदिन ८०० ते नऊ हजार ५०० रुपये भाडय़ाची आकारणी करते. अर्थात तुम्ही गाडी कोणती निवडता यावर भाडय़ाचे प्रमाण अवलंबून असते. कार्झऑनरेंटकडे ई20 ते मर्सडिीज ई क्लास अशा सर्व प्रकारच्या गाडय़ा उपलब्ध आहेत.
dr05तुम्हाला शहरातल्या शहरात फिरण्यासाठी गाडी हवी असेल तर तशीही सोय कार्झऑनरेंटकडे उपलब्ध आहे. शिवाय ३९ शहरांमध्ये ही सेवा पुरवली जाते. तसेच देशातील दहा मोठय़ा विमानतळांवरही त्यांची सेवा उपलब्ध आहे.
सणासुदीच्या हंगामात गाडी भाडय़ाने घेऊन पर्यटनाला जाण्याकडे कल वाढू लागला असल्याने कार्झऑनरेंट आणि माइल्स आउटस्टेशन ड्रायिव्हग हॉलिडे ही सेवा पुरवतात. त्यासाठी तुम्ही फक्त त्यांच्या संकेतस्थळांवर जाऊन तुमची मागणी नोंदवायची असते किंवा तुमच्या मोबाइलवरही त्यांचे अ‍ॅप डाउनलोड करता येऊ शकते.

आमच्या ग्राहकांसाठी आम्ही एन्ट्री लेव्हल कारपासून ते टॉप एन्डपर्यंतच्या गाडय़ा उपलब्ध करून देतो. आणि त्या त्या गाडीनुसार भाडय़ाची आकारणी करतो. देशभरातील ३९ शहरांमध्ये आमची ही ग्राहकसेवा रुजू आहे.
– राजीव विज,व्यवस्थापकीय संचालक, कार्झऑनरेंट
आम्ही आमच्या ग्राहकांना विविध प्रकारच्या गाडय़ांची सेवा देऊ करतो. हल्लीच्या तरुणांमध्ये हा ट्रेण्ड वाढू लागला आहे. स्वतच ड्रायिव्हग करणे हा वेगळाच आनंद असतो आणि आम्ही तो आमच्या ग्राहकांना देतो, याचा आम्हाला अभिमान आहे.

– साक्षी विज, संस्थापक व सीईओ, माइल्स

टीम ड्राइव्ह इट – ls.driveit@gmail.com