निवडणूक म्हटली की प्रचार आणि प्रचाराचे वेगवेगळे तंत्र येतात. प्रत्येकजण आपापले कौशल्य पणाला लावून प्रचार करत असतो. स्वतःचा प्रचार करत असतानाच विरोधी उमेदवार कसा कुचकामी आहे? याचाही प्रचार केला जातो. महाराष्ट्रातही अहमदनगर दक्षिण लोकसभेत इंग्रजी येतं की नाही? हा प्रचारात कळीचा मुद्दा ठरला आहे. तमिळनाडूमध्ये निवडणूक प्रचारात पैसा पाण्यासारका ओतला जातो. निवडणूक आयोगानेही यावर अनेकदा भाष्य केले आहे. मात्र तिरुचिरापल्ली या लोकसभा मतदारसंघातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त अपक्ष आमदार भाजी विकून स्वतःचा प्रचार करत आहे. भाजी विकण्याचे कारण काय? आणि त्यांनी हा मार्ग का निवडला? हे पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिरुचिरापल्ली मधील एस. दामोदरन (वय ६२) हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांना गॅस स्टोव्ह हे चिन्ह मिळाले आहे. आपला प्रचार हटके पद्धतीने करण्यासाठी त्यांनी मतदारसंघातील गांधी बाजारात भाजी विकण्याचा निर्णय घेतला. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना ते म्हणाले, “मी अपक्ष निवडणूक निवडणूक लढवत आहे. ४० वर्षांहून अधिक काळ मी स्वच्छता केंद्रात मी स्वयंसेवक काम करत होतो. वयाच्या २१ व्या वर्षी मी कामाला सुरुवात केली होती. आता माझे वय ६२ असून मला ६० व्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.”

निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?

राजीव गांधी पंतप्रधान असताना मी सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली होती. माझ्या आतापर्यंतच्या कार्यकाळात मी नऊ पंतप्रधानांना भेटलो आहे. मी केंद्र सरकारच्या ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमात सहभागी झालो होतो आणि प्रत्येक गावात एक आदर्श व्यवस्था निर्माण होईल, असा प्रयत्न केला होता.

Video: ‘बाळासाहेबांच्या प्रसिद्ध डायलॉगने सुरुवात, उबाठावर टीका, मोदींचे आवाहन’, शिंदे गटाचे प्रचार गीत प्रसिद्ध

भाजी विकण्याच्या आपल्या संकल्पनेबाबत बोलताना ते म्हणाले की, गांधी बाजार हा मतदारसंघातील महत्त्वाचा भाग आहे. याठिकाणी भाजी विकताना माझा अनेक लोकांशी संबंध आला. त्यांना माझ्या कल्पना सांगता आल्या. मी जर निवडून आलो तर काय करू शकेन, हे मी त्यांना समजावले. आपल्या तिरुचिरापल्ली शहराला स्वच्छ सुंदर राखले पाहीजे, असे माझे मत आहे. लोकांना शहरात रिंग रोडची आवश्यकता आहे. तसेच शहरात उड्डाणपूल व्हावेत, यासाठीही मी प्रयत्न करणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padma shri awardee s damodaran selling veggies for his poll campaign kvg
Show comments