Premium

Assembly Elections Result 2023: “तेलंगणात प्रचाराआधी मोदी कपाळाला चंदन लावून…”, संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल!

संजय राऊत म्हणतात, “आपला निवडणूक आयोगही भाजपच्या गाभाऱ्यात डोळे मिटून ध्यानस्थ बसला आहे!”

sanajy ruat targets narendra modi
संजय राऊतांचा नरेंद्र मोदींवर टीका (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून या निवडणुका व त्यांचे निकाल हा चर्चेचा विषय ठरला आहे. रविवारी या राज्यांमधील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपावर सामनातील ‘रोखठोक’ या सदरातून परखड भाष्य केलं. यावेळी भाजपाच्या निवडणूक प्रचारनीतीवर संजय राऊतांनी टीकास्र सोडलं असून त्याच्या केंद्रस्थानी पंतप्रधान आहेत. “देवळात घंटा बडवून, शेंड्यांना तूप लावून, केदारनाथच्या गुहेत ध्यानस्थ बसल्याचं छायाचित्र प्रसिद्ध करून देशातील समस्या संपणार नाहीत”, असा खोचक सल्लाही राऊतांनी मोदींना दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे लेखात?

संजय राऊतांनी रोखठोक सदरातील आपल्या लेखात पाच राज्यांतील निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर मोदींना लक्ष्य केलं आहे. योगींनी हैदराबादचं नाव भाग्यनगर करण्याची घोषणा केल्यावरून त्यांनी भाजपावर टीका केली. “भाजपा म्हणजे देशातील शहरे व रस्त्यांची नावे बदलणारा कारखाना झाला आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, फैजाबादसह अनेक जिह्यांची नावे योगींनी बदलली, पण प्रदेशातील गरिबी, बेरोजगारी त्यामुळे संपली नाही. हैदराबादच्या निजामाला स्वतंत्र भारतात विलीन व्हायचे नव्हते, पण सरदार पटेल यांनी पोलीस अॅक्शन घेतली व हैदराबादेतच निजामास शरण यावे लागले. हैदराबाद हे विजयाचे प्रतीक आहे. ते तसेच राहिले पाहिजे”, असं राऊतांनी नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut mocks pm narendra modi five state assembly election results 2023 pmw

First published on: 03-12-2023 at 07:32 IST
Next Story
Chhattisgarh Election Result 2023 : भाजपाला स्पष्ट बहुमत, सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा