लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे बाकी आहेत एक २५ मे रोजी होणार आहे तर सातवा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. या दोन्ही टप्प्यांचा प्रचार सुरु आहे. पटियाला या ठिकाणी पार पडलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्तारपूरबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पटियाला या ठिकाणी जे भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं त्यात कर्तारपूरबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. एका रॅलीमध्ये ते बोलत होते.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

“मी जर १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झालं त्यावेळी मी जर पंतप्रधान असतो तर आत्मसमर्पण करणाऱ्या ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना सोडवलं असतं. तसंच पाकिस्तानकडून कर्तारपूर साहेब परत घेतलं असतं.” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “मी मनुष्यपोटी जन्मलो नाही”, पंतप्रधान मोदींच्या त्या दाव्यावर राहुल गांधींची टीका; म्हणाले, “देवा असा कसा…”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करतारपूर साहेब गुरुद्वाऱ्याचा भावनात्मक मुद्दा उपस्थित केला. देशाच्या फाळणीसाठी काँग्रेस जबाबदार आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. देशाची फाळणी झाली तेव्हा करतारपूर साहेब पाकिस्तानमध्ये जो पंजाब प्रांत गेला त्यात गेला. करतारपूर साहेब गुरुद्वारा भारताच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर आहे.

मी पंतप्रधान असतो तर..

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “७० वर्षांपासून आपण करतारपूर साहेब गुरुद्वारा दुर्बिणीतून पाहतो होतो. १९७१ मध्ये हा गुरुद्वारा भारतात येऊ शकत होता. मी जर तेव्हा पंतप्रधान असतो तर ही गोष्ट घडवली असती.” पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेसने ही गोष्ट केली नाही. मात्र २०१९ मध्ये आमच्या सरकारने करतापूर साहेब या ठिकाणी जाण्याचा मार्ग खुला केला. त्यामुळे शिख बांधव या ठिकाणी जाऊ शकले.” पटियालाचे भाजपाचे लोकसभेच्या उमेदवार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं. त्यात हे वक्तव्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाब सरकारवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात पंजाब सरकारवरही जोरदार टीका केली. “पंजाबमध्ये ड्रग्ज माफिया आणि शूटर्स गँग यांचं राज्य सुरु आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे फक्त कागदोपत्री मुख्यमंत्री आहेत. बाकी त्यांना पंजाबच्या परिस्थितीशी काही घेणंदेणं नाही. सगळे मंत्री मजा-मस्ती करत आहेत. अशा परिस्थितीत पंजाबचा विकास कसा होईल? सध्याचं पंजाबमधलं भगवंत मान सरकार हे भ्रष्ट सरकार आहे. “