घरगुती कोविड-१९चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळतो का? तर याचे उत्तर होय असे आहे. मात्र अमेरिकेतील आरोग्य अधिकारी म्हणतात की प्रारंभिक माहिती असे दर्शवते की ते ते कमी संवेदनशील असू शकतात. घरगुती चाचण्या वापरण्यासाठी सरकारच्या शिफारशी बदललेल्या नाहीत. जेव्हा रॅपिड अँटिजेन टेस्ट करणे महत्त्वाचे असते तेव्हा लोकांनी त्यांचा वापर करणे सुरू ठेवावे.

अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट कॉलेजच्या अध्यक्ष डॉ. एमिली वोल्क म्हणतात, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेल्टा असो किंवा अल्फा किंवा ओमायक्रॉन असो, चाचण्या अजूनही कोविड-१९ ओळखतात.”

russia grain diplomacy marathi news
विश्लेषण: रशियाची ‘अन्नधान्य डिप्लोमसी’ काय आहे? तिची जगभरात चर्चा का?
Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
loksatta explained article, crude oil price, hike, Iran Israel conflict, india, on petrol diesel prices
विश्लेषण : इराण-इस्रायल संघर्षातून खनिज तेलाचा भडका… भारतात निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढ अटळ?
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न

प्रत्येक नवीन व्हेरिएंट येत असताना रॅपिड अँटिजेन टेस्ट अजूनही काम करतात याची खात्री करण्यासाठी सरकारी शास्त्रज्ञ तपास करत आहेत. या आठवड्यात, अन्न आणि औषध प्रशासनाने सांगितले की प्राथमिक संशोधन सूचित करते की घरगुती चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन आढळून येतो, पण त्याची संवेदनशीलता कमी असू शकते. प्रशासनाने नमूद केले की नोव्हेंबरच्या उत्तरार्धात प्रथम आढळलेल्या व्हेरिएंटसह चाचण्या कशा कार्य करतात याचा अभ्यास करत आहे. घरगुती चाचण्यांचे बरेच चांगले उपयोग आहेत. लसीकरणाबरोबरच, ते तुम्हाला कुटुंब आणि मित्रांसह एकत्र येणाऱ्यांसाठी अधिक सोयीस्कर बनवू शकतात.

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात असाल ज्याची सकारात्मक चाचणी आली असेल पण तुम्हाला लक्षणे दिसत नाहीत, तर पाच दिवसांनंतर रॅपिड अँटिजेन टेस्टद्वारे तुम्हाला व्हायरसची लागण झाली आहे की नाही हे समजू शकते. तुमचे वाहणारे नाक किंवा घसा खवखवणे यामागे कोविड-१९ आहे की नाही याची तुम्हाला खात्री नसल्यास हे देखील मदत करू शकते.

पण निकाल पाहताना संदर्भ विचारात घ्या. उच्च संसर्ग दर असलेल्या भागात नाईट क्लबमध्ये गेल्यावर तुम्हाला आजारी वाटत असल्यास, उदाहरणार्थ तुम्ही घरातील चाचणीचा नकारात्मक परिणाम जरा जास्त संशयाने पहावा, असे तज्ञ्जांचे मत आहे. पीसीआर चाचणी करणे ही चांगली कल्पना आहे. त्या चाचण्या अधिक अचूक असतात आणि त्या चाचणी लॅब आणि हॉस्पिटलमध्ये केल्या जातात.

दरम्यान, भारतात भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान संस्थेने रॅपिड अँटिजेन टेस्ट कीट वापरून घरच्या घरी करोनाची चाचणी करण्यास मान्यता दिली आहे. फक्त लक्षणं असलेल्या व्यक्ती आणि करोनाबाधितांच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तीच फक्त या कीटने घरी चाचणी करु शकतात. या चाचण्यांचा अनावश्यक आणि अंदाधुंद वापर टाळण्याचा सल्लाही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

या चाचण्यांनंतर ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्यांना करोनाबाधित म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्यांना कोणत्याही इतर चाचण्याची गरज पडणार नाही. मात्र, लक्षणं असलेल्या ज्या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह येतील त्यांनी लगेचच आरटीपीसीआर टेस्ट करणं आवश्यक असल्याचं मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास सदर रुग्णाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार त्वरीत गृहविलगीकरणात राहायचं आहे. लक्षणं असलेल्या ज्या व्यक्तींची ही चाचणी निगेटिव्ह येईल त्या सर्वांना संशयित करोना रुग्ण म्हणूनच ग्राह्य धरण्यात येईल.