नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतील मतांची अंतिम टक्केवारी मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केली. १०२ मतदारसंघांचा समावेश असलेल्या पहिल्या टप्प्यामध्ये ६६.१४ टक्के, तर ८८ मतदारसंघांच्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये ६६.७१ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये दोन्ही टप्प्यांमध्ये अनुक्रमे ६९.५८ टक्के व ६९.४५ टक्के झाले होते. यंदा मतांमध्ये अनुक्रमे ३.४४ टक्के व २.७४ टक्क्यांची घसरण  झाली.

महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यांमध्ये अनुक्रमे ६३.७१ टक्के व ६२.७१ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये अनुक्रमे ६३.०४ टक्के व ६२.८५ टक्के मतदान झाले होते. या वेळी पहिल्या टप्प्यामध्ये ०.६७ टक्क्यांची वाढ झाली असली तरी दुसऱ्या टप्प्यात मतांमध्ये ०.१४ टक्के घट झाली आहे. २०२४ मध्ये दोन टप्प्यांमध्ये सरासरी ६३.२१ टक्के मतदान झाले, तर २०१९ मध्ये सरासरी ६२.९४ टक्के झाले होते. त्यामुळे या वेळी पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतांच्या सरासरी टक्केवारीत ०.२७ टक्के वाढ झाली आहे.   देशभरात  दुसऱ्या टप्प्यामध्ये मणिपूरमध्ये ८४.३५ टक्के मतांचा उच्चांक, तर उत्तर प्रदेशात ५५.१९ टक्क्यांचा नीचांक नोंदवला गेला.

Loksatta lalkilla BJP Voting in the first phase of the Lok Sabha elections NDA
लालकिल्ला: भाजपसाठी आकडय़ांची जुळवाजुळवी
Preparations of the political parties for the assembly elections have started
विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू
Election Commission has released the polling data for the five phases of the Lok Sabha elections
गडचिरोलीत सर्वाधिक, दक्षिण मुंबईत सर्वात कमी; लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांतील मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर
More voting by women in the fifth phase lok sabha election
पाचव्या टप्प्यात महिलांकडून अधिक मतदान
nana patole
“निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे मतदानाची टक्केवारी कमी”; नाना पटोलेंचा थेट आरोप; म्हणाले, “पहिल्या टप्प्यानंतर…”
lok sabha election 2024 more than 59 percent turnout in the fifth phase of ls polls
Lok Sabha Polls Phase 5 : पाचव्या टप्प्यात ५९ टक्क्यांहून अधिक मतदान; पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचे गालबोट
women voters
Election 2024 : पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान अधिक, यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या का वाढली?
Mumbai, Confusion, voters,
मुंबई : मतदान यादी क्रमांकामुळे मतदारांमध्ये संभ्रम