असे का होते?
आयुर्वेदानुसार, वाढणारी उष्णता व शरीरातील जास्तीचे पित्त यामुळे अंत:त्वचेला इजा होऊन तोंड येते. पोट साफ नसेल तर हे लवकर बरे होत नाही.
उपाय काय?
* १०-१२ काळे मनुके रात्री पाण्यात भिजत घालावेत. ते सकाळी बारीक चावून खावे.
* सकाळी-सायंकाळी एक-एक चमचा गुलकंद खावा.
* जखमांना ज्येष्ठमध किंवा शुद्ध गेरूची पूड लावावी.
* अंजीर, द्राक्ष ही फळे खावीत. आहारात दूध, नारळ पाणी, कोथिंबीर यांचा समावेश असावा.
* रोज रात्री त्रिफळा चूर्ण घ्यावे.
यामुळे काय होते?
* पोट साफ होऊन वाढलेले पित्त शरीराबाहेर पडते. जखमा लवकर बऱ्या होतात.
इतर काय काळजी घ्यावी?
* आंबट, तिखट, खारट पदार्थ (उदा. दही, मसाले, लोणचे, इत्यादी.) खाऊ नयेत.
* साधे उकडलेले जेवण घ्यावे.
* जास्त बोलणे व जागरण टाळावे.
वैद्य सदानंद सरदेशमुख

what is heatwave in marathi
विश्लेषण: वाढत्या तापमानाचा तडाखा किती तीव्र? उष्माघात प्राणघातक कसा ठरतो?
Health Special What exactly is heatstroke How to avoid it What is the solution
Health Special: उष्माघात म्हणजे नेमके काय? तो कसा टाळायचा? उपाय काय?
Guru Asta 2024
३ मे पासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? देवगुरु अस्त होताच उत्पन्नात होऊ शकते मोठी वाढ
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?