News Flash

DC vs RR Video : जोफ्रा आर्चरचा ‘पृथ्वी’ला धक्का, पहिल्याच चेंडूवर केली दांडी गुल

पृथ्वी शॉ-अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी

फोटो सौजन्य - IPL/BCCI

आयपीएलचा तेरावा हंगाम आता मध्यावधीवर आला असून प्रत्येक संघ प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान निश्चीत करण्यासाठी धडपड करतो आहे. दुबईच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात सुरुवातीच्या क्षणांमध्येच मोठं नाट्य घडताना दिसलं. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने राजस्थानविरुद्ध सामन्यासाठी हर्षल पटेलला विश्रांती देत मुंबईच्या तुषार देशपांडेला संघात संधी दिली.

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन ही दिल्लीची सलामीची जोडी मैदानात उतरल्यानंतर जोफ्रा आर्चरने पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉला माघारी धाडलं. १४३.५ किमीच्या वेगाने जोफ्रा आर्चरने टाकलेला चेंडू पृथ्वी शॉला समजलाच नाही. टप्पा पडून आत आलेल्या चेंडूने बेल्स उडवल्या आणि दिल्लीला पहिला धक्का बसला. पाहा हा भन्नाट व्हिडीओ…

पृथ्वीची विकेट घेतल्यानंतर जोफ्रा आर्चरने आपला सहकारी रियान परागसोबत प्रसिद्ध बिहू डान्सही केला.

पृथ्वी शॉची विकेट घेतल्यानंतर जोफ्रा आर्चरने ठराविक अंतराने अजिंक्य रहाणेचाही अडसर दूर केला. ९ चेंडूत अवघ्या २ धावा करत अजिंक्य आर्चरच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 7:53 pm

Web Title: ipl 2020 watch how jofra archer rattle prithvi shaw stumps psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 मराठमोळ्या तुषार देशपांडेचं IPLमध्ये पदार्पण, दिल्लीच्या संघाकडून खेळणार पहिला सामना
2 IPL 2020 : Mid Transfer Window मधून CSK नवीन खेळाडूंना संधी देणार??
3 IPL 2020 : तब्बल ६ वर्षांची तपश्चर्या दुबईच्या मैदानात भंग
Just Now!
X